आटाचक्की

मैत्रिणींनो धान्य दळायला टाकणे आणि ते आणणे नाही म्हणलं तरी नकोसं  काम वाटतं. कधी कधी आपल्या ऑफिसच्या कामांमुळे दळण विसरलं जातं, तेव्हा असं वाटत की पटकन पीठ मिळालं तर किती बरं होईल. तर आता आपली दळणाची समस्या कायमची सुटली आहे आधुनिक आटाचक्कीमुळे.

भारतीय खाद्य परंपरेनुसार आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खातो. जसं कि उन्ह्याळ्यात नाचणीची भाकरी किंवा हिवाळ्यात बाजरीची भाकरी वगैरे.शिवाय आपल्याला वेगवेगळी पीठे हाताशी  असण्याची सवय असते, जसं कि बेसन, तांदळाची पिठी इत्यादी. आपण हि सर्व पीठे गिरणीतून दळून आणतो परंतु ती आपल्याला आपल्या वेळेत मिळतील याची खात्री नसते, त्यासाठी आपल्याला खूप आधी पूर्वनियोजन करून घरातील पीठ संपायच्या आधी दळून आणावे लागते. परंतु  आपण आता आटाचक्कीचा वापर करून घरच्या घरी आपल्याला हवे ते व हवे तेवढे धान्य हव्या त्या वेळी दळू शकतो.

आटाचक्की वापरून काही मिनिटामध्ये आपण धान्य दळू शकतो. ना कुठे धान्य उचलून न्यायची झंझट ना गिरणीत थांबण्याची कटकट.  कोणतंही धान्य, डाळी आणि अगदी हळद, मिरच्यांसारखे मसालेदेखील आपण आटाचक्की मध्ये पटकन दळू शकतो.

आधुनिक स्त्रीच्या हाती अगदी असायलाच हवी ही आटाचक्की किंवा जिला आपण घरघंटी सुध्दा म्हणतो. ही आटाचक्की आपला खूप वेळ वाचवते. शिवाय धान्य दळायला येणार खर्चदेखील कमी असतो.

ताज्या ताज्या दळलेल्या पीठामध्ये सर्व पोषकतत्वे जशीच्या तशी  मिळतात उदा. प्रथिने(प्रोटिन्स), व्हिटॅमिन्स, कर्बोदके(कार्बोहायड्रेट्स) इत्यादी.

या ही आटाचक्की एका तासात जवळपास ७ ते ८ किलोग्रॅम धान्य दळू शकते. यामध्ये वेगवेगळ्या जाळ्या मिळतात जेणेकरून आपण आपल्याला हव्या त्या जाडीचे पीठ दळू शकतो.  या आटाचक्की मध्ये आपण गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, बेसन, हळद, मूग आणि बऱ्याच गोष्टी दळू शकतो.  शिवाय आपण घरच्या घरी वेगवेगळ्या धान्यांचा रवासुध्दा काढू शकतो.

ही डबल डोअर असणारी आटाचक्की तर खूप  उपयोगी आहे कारण यामध्ये साठवणुकीसाठी जास्तीची जागा आहे. याच्या बिजागरी गोल आहेत शिवाय वरील दार हे अतिशय हळुवारपणे बंद होते (सॉफ्ट क्लोजिंग ).

ही विजेवर चालणारी आटाचक्की आहे. वापरायला आणि स्वच्छ करायला एकदम सुलभ आहे. मध्ये १ एच पी ची इलेक्ट्रिक मोटर आहे. मोटर स्पीड २८८० आर पी एम एवढा आहे. बऱ्याच आटाचक्कीमध्ये मोटारीची १० वर्षांची गॅरंटी मिळते व बाकीच्या पार्ट्सची २ वर्षांची गॅरंटी मिळते. फक्त त्यातल्या प्लास्टिक आणि रबरी भागांची कसलीही गॅरंटी मिळत नाही.कटर-चेंबर ची कायमची  गॅरंटी मिळते.

चला तर मग अजिबात वेळ न दवडता इथे क्लिक करून लगेचच ऑर्डर करा आटाचक्की.