About

नमस्कार मैत्रिणींनो ,

माझ्या या goodtools.in या साईटवर तुमचे मनापासून स्वागत. तुमच्यापैकी बऱ्याचजणीं गृहिणी, नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या देखील असाल पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान  आहे ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर. स्त्रियांचा बराचसा वेळ या स्वयंपाकघरात म्हणजेच  हल्लीच्या मॉडर्न भाषेतल्या  ‘किचन’ मध्ये जातो. आपलं सध्याचं आयुष्य हे फार वेगवान झालंय त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर स्वयंपाकघरातील  कामे  आवरायची असतात, त्यासाठी आपल्याला विविध साधनांचा वापर करावा लागतो पण बऱ्याचदा आपल्याला या साधनांची म्हणावी तेवढी माहिती नसते आणि म्हणूनच मी आपल्यासाठी घेऊन आलेय वैविध्यपूर्ण साधनांचा खजिना जी वापरायला सुलभ असतील, आपल्या बजेटमध्ये असतील आणि महत्वाचं म्हणजे आपला पुष्कळ वेळ वाचवतील.

मी स्वतः एक नोकरी करणारी गृहिणी आहे.  ‘नोकरी करणारी गृहिणी’ संकल्पना वेगळी वाटली तरी हल्ली बऱ्याच स्त्रियांची हीच स्थिती आहे, विशेषतः ज्या घरातून काम (work from home) करतात. अशा परिस्थितीत स्त्रियांपुढे घर सांभाळणे व त्याबरोबरच नोकरी किंवा व्यवसाय घरातून सांभाळणे अशी दुहेरी जबाबदारी एकाचवेळेस असते. मग घरातली कामे आवरताना आपल्या हाताशी काही साधने, उपकरणे असतील तर कामे  झटपट आवरली जातात व आपल्या हाताशी थोडा वेळ उरतो, जो आपण आपले छंद जोपासण्यासाठी वापरू शकतो.

अशाच विविध साधनांची माहिती मी आपल्याला देणार आहे माझ्या ब्लॉग्स मधून, तेव्हा फक्त तुमच्यासाठी वाचत रहा goodtools.in