एअर फ्रायर

एअर फ्रायर हे एक लहान इलेकट्रीक उपकरण आहे जे खूप कमी तेलात किंवा तेलविना पदार्थ तळण्यासाठी बनविले आहे. अन्न तेलात न बुडवता खोल तळण्याचे (डीप फ्राय) फक्त अनुकरण केले जाते, पण पदार्थ मात्र डीप फ्राय केल्यासारखाच बनतो. यामध्ये अतिशय कमी तेलात काम केले जाते, ज्यामुळे आपले आरोग्य राखण्यास मदत होते. अतितेलाचा वापर हे आपले आरोग्य बिघडण्याचे कारण आहे, जे या एअर फ्रायर मुळे टाळता येते.

एअर फ्रायरचे कुकिंग चेंबर अन्नाजवळील गरम घटकातून उष्णता पसरवते आणि यामध्ये असलेला पंखा उच्च वेगाने गरम हवा फिरवतो व पदार्थावर एक कुरकुरीत थर तयार होतो. तापमान 250 डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते, हे ज्या त्या मॉडेलवर अवलंबून असते. एअर फ्रायरमध्ये स्वयंपाकास लागणारा वेळ २0%  किंवा त्यापेक्षाही कमी लागू शकतो.

पारंपारिक तळण्याच्या पद्धती १४0 ते १६५ °C (२८४ ते ३२९ °F) तापमानात पाण्याच्या उकळत्या बिंदूच्या वर, गरम तेलात अन्न पूर्णपणे बुडवून मेलार्ड इफेक्ट निर्माण करतात. एअर फ्रायर इच्छित अन्न तेलाच्या पातळ थरात कोटिंग करून २00 डिग्री सेल्सिअस (३९२ ° फॅ) पर्यंत गरम केलेल्या हवेला उष्णता लागू करण्यासाठी आणि प्रतिक्रिया सुरू करण्यासाठी कार्य करते. याचा परिणाम म्हणजे , हे उपकरण पारंपरिक डीप फ्रायरपेक्षा ७0% ते ८0% कमी तेल वापरून बटाटा चिप्स, चिकन, फिश, स्टेक, चीजबर्गर, फ्रेंच फ्राईज किंवा पेस्ट्रीसारखे पदार्थ खरपूस  बनवू शकते. बहुतेक एअर फ्रायर्समध्ये तापमान आणि टाइमर अडजस्टमेंट्स असतात ज्यामुळे  स्वयंपाक अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. अन्न त्यामध्ये असलेल्या एका बास्केटमध्ये  शिजवले जाते जे ड्रीप ट्रेवर बसविलेले असते

एअर फ्रायर मध्ये अन्न शिजविण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम जे अन्न शिजवायचे आहे ते बास्केट मध्ये ठेवा
  2. त्यानंतर  वेळ आणि तापमान सेट करा.
  3. आता अन्नाला शिजू द्या. कधी कधी आपल्याला मध्येच पदार्थ उलटवावा लागतो ज्याने तो सर्व बाजूनी कुरकुरीत होतो

याची क्षमता ३.५ लि. ची आहे.. एअर फ्रायर स्वच्छ करायला देखील सोपा असतो व डिश वॉशर सेफ असतो.

फ्रोझन  फूड ज्याला डीप फ्राय ची गरज असते जसे कि फ्रेंच फ़्राईस, मोझारेला स्टिक्स, चिकन नगेट्स इ., तश्या प्रकारचे अन्न बनवू शकतो, किंवा ताजे अन्न देखील बनवू शकतो. यामध्ये चिकन, फिश आणि मटण देखील उत्तम बनते. ज्याला बेक करावे लागते अशा असे अन्नपदार्थ बनवू शकतो जसे की कुकीज.

हल्ली आपण आपल्या आरोग्याविषयी खूपच जागरूक झालो आहोत त्यामुळे कमी तेलात पदार्थ बनवून आपण आपले आरोग्य नक्कीच राखू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच हे यंत्र खरेदी करू शकता