बहुउपयोगी हवेची गादी |Inflatable Car Bed Mattress

प्रवासाची हौस कोणाला नसते ? हल्लीच्या नवीन पिढीला तर सुट्टीच्या दिवशी घरी राहणे म्हणजे चूकच वाटते. आणि ज्यांच्या कामाचा आठवडा ५ दिवसांचा असतो त्यांचं तर विचारूच नका. शनिवार रविवार आला कि काढा गाडी आणि निघा प्रवासाला. अर्थात त्यात काही गैर नाहीये म्हणा. परंतु प्रवासात विश्रांती मिळणे अवघड असते. गाडी मध्ये सतत बसून प्रवास करावा लागतो, मोठ्यांचे तर अंग अवघडतेच परंतु छोट्या मुलांना त्याचा त्रास होतो आणि मग त्यांची किरकिर सुरु होते. गाडी कुठे थांबवून विश्रांती घ्यावी म्हणाल तरी सीटवर नीट झोपता येत नाही. तर अशाच परिस्थितीचा विचार करून एक नवीन हवेची गादी बनवली आहे, ती गाडी मध्ये मागच्या सीटवर व्यवस्थित घालता येते आणि आपण घरात बेडवर झोपतो तसे झोपू शकतो.

हि हवेची गादी असल्याने वापरायच्या वेळेला यामध्ये हवा भरावी लागते आणि काम झाले कि हवा काढून गुंडाळून ठेवता येते. हवा भरण्यासाठी याच्यासोबत एक इलेक्ट्रिक पंप येतो जो आपण गाडीच्या चार्जिंग पोर्टला लावून सुरु करू शकतो. तो वापरायला इतका सोपा असतो की लहान मुले देखील तो वापरून गादीमध्ये हवा भरू शकतात.

या पंपासोबत तीन प्रकारचे नोझल्स येतात. छोटे नोझल उश्यामध्ये हवा भरण्यासाठी, दुसरे नोझल गादीमध्ये हवा भरण्यासाठी आणि तिसरे नोझल पुढच्या आणि मागच्या सीट मध्ये जो गॅप असतो तिथे एक सपोर्टर दिला जातो त्यामध्ये हवा भरण्यासाठी दिले जाते.

कोणत्याही प्रकारच्या गाडीसाठी ही गादी अगदी योग्य आहे. ती १८० किलो वजन पेलू शकते. त्यामुळे दोन व्यक्तीना आराम करण्यासाठी किंवा चारपाच छोटी मुले खेळू शकतील अशी आहे. खरंतर ही गादी बहुउपयोगी आहे. तिचा वापर आपण घरात आराम करण्यासाठी,  पिकनिक मध्ये , गाडीमध्ये , लांबच्या प्रवासात  किंवा जंगल सफारी मध्ये वगैरे करू शकतो.

हवा काढून टाकल्यावर तिची इतकी छोटी घडी होते कि ती सहजपणे कुठेही ठेवता येते. घडी केल्यावर ठेवण्यासाठी त्याच्यासोबत मिळणाऱ्या आकर्षक पिशवीमध्ये ती आपण सहज ठेवू शकतो. तिच्यासोबत येणाऱ्या हवा भरायच्या पंपाला १२V DC इनपुट लागते. तो पंप चालू करणाऱ्यासाठी गाडीमध्ये असणाऱ्या सिगारेट लाईटरला तो आपण जोडू शकतो.

तिच्यामधील हवा काढणे सुध्दा एकदम सोप्पे आहे फक्त ब्लीडर वाल्व उघडा कि लगेच हवा जाते. या सोबत एक रिपेअर किट देखील येते म्हणजे समजा प्रवासात कदाचित टोकेरी वस्तू धडकल्यामुळे याला छिद्र पडले तरी ते आपण दुरुस्त करू शकतो.

ही गादी उच्च प्रतीच्या पी व्ही सी मटेरियल पासून बनलेली आहे त्यामुळे ती फाटण्याची शक्यता कमीच असते. यामुळे बाहेरचे तापमान कमी झाले तरी थंडीदेखील वाजत नाही. ही बहुतेक सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये व्यवस्थित मावते. ही गादी  ड्रायव्हिंग दरम्यान कंपन आणि अडथळे कमी करून आरामदायक वातावरण प्रदान करते. वाहनाच्या तळापासून आवाज प्रभावीपणे अवरोधित करते त्यामुळे झोपण्यासाठी शांत वातावरण मिळते .

अशी ही बहू उपयोगी, आरामदायी गादी तुम्ही इथे क्लिक करून आत्ताच मागवू शकता.

Tags: