गाडी आतमधून स्वच्छ करणारा फोम | Car Interior Cleaner Multipurpose Foam

चारचाकी गाडी वापरणे आता चैनीची वस्तू राहिली नाही तर काळाची गरज झाली आहे. हल्ली बऱ्यापैकी सर्व माध्यम वर्गीय माणसांकडे चारचाकी गाडी असतेच. एकमात्र आहे गाडी असण्याचे फायदे जसे आहेत त्याचप्रमाणे त्याची देखभाल करणे हे एक मोठेच काम आहे. रोजच्या रोज ती धुणे, स्वच्छता करणे इत्यादी कामे  करावीच लागतात. तरीसुध्दा गाडी पूर्ण स्वच्छ होत नाही. त्यातल्यात्यात गाडी बाहेरून व्यवस्थित स्वच्छ करता येते पण आतील भागाचं काय ? आतूनसुद्धा गाडी व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यासाठी आला आहे गाडी आतून स्वच्छ करणारा फोम म्हणजेच तयार फेस. हा एक स्प्रे च्या स्वरूपात बाटलीमध्ये येतो.

या क्लीनरमध्ये मजबूत निर्जंतुकीकरण आहे. तो  घाण त्वरीत साफ करू शकतो आणि कोणत्याही गोष्टीचा पृष्ठभाग अगदी नव्यासारखा बनवू शकतो. वाहन, मोटारसायकल इत्यादींचे  भाग जसे की सीट, छत, सीट बेल्ट, डॅशबोर्ड, ड्राइव्हिंग व्हील, पाय ठेवण्याची जागा इत्यादी अगदी नव्यासारखे स्वच्छ करू शकतो.

इतकच नाही तर हा फोम वापरून आपण घरातील फर्निचर आणि किचन मधील वस्तू आणि ट्रॉलीज वगैरे एकदम स्वच्छ करू शकतो. त्याचप्रमाणे बाथरूम मधल्या टाईल्स , भिंती, वॉल पेपर, एक्झॉस्ट फॅन , चिमणी , पावडर कोटेड फर्निचर इत्यादी साफ करू शकतो. 

हा वापरण्यासाठी  जे स्वच्छ करायचे आहे त्यावर प्रथम स्प्रे करावा नंतर तो पृष्ठभाग थोडासा घासावा आणि त्यानंतर मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा. स्प्रे करताना तो कमीत कमी २० सेंटिमीटरवरून करावा.

इथे क्लिक करून हा मल्टी पर्पज स्प्रे आत्ताच मागवा आणि आपली गाडी आणि घर एकदम नव्यासारखं ठेवा.