फरशी पुसण्यासाठी  इलेक्ट्रिक स्पिन मॉप

नमस्कार मंडळी, आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय उपयुक्त उपकरण ज्याने आपलं बराचस काम सोप्प होईल.

आपल्या रोजच्या आयुष्यात घराच्या स्वच्छतेला खूपच महत्व आहे. पूर्वी बऱ्याचशा स्त्रिया या नोकरी किंवा व्यवसाय न करणाऱ्या होत्या त्यामुळे त्या स्वतःच घराची साफसफाई किंवा स्वच्छता करत असत. त्यातल्या त्यात ज्या नोकरी करायच्या त्यांची तर फारच धावपळ व्हायची. परंतु हल्ली स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्याने इच्छा असूनही त्यांना स्वतःला घराच्या स्वच्छतेला फार वेळ मिळत नाही. मग  अशावेळी आपण फरशी झाडणे, पुसणे यासाठी एखादी बाई कामाला ठेवतो, परंतु कामवाल्या बाईच्या सुट्ट्या, आजारपणं, मुलांचे तसेच तिच्या घरातले प्रॉब्लेम्स यामुळे बऱ्याचदा म्हणावी तशी फरशीची स्वच्छता होत नाही आणि साहजिकच गृहिणी म्हणून आपले मन अस्वस्थ राहते.

परंतु आता आपली काळजी संपली कारण आता आला आहे फरशी पुसण्यासाठी इलेक्ट्रिक स्पिन मॉप. यामध्ये आपल्या स्वतःला फरशी पुसण्यासाठी जोर लावायची गरज नाही कारण यामध्ये आहे इलेकट्रीक मोटर. मॉप सुरु केला की आपण जसा फिरवू तशी तिथली फरशी  स्वच्छ पुसून निघते. ना खाली बसण्याची झंझट ना जोर लावण्याची कटकट बस मॉप  सुरु करा आणि फरशी स्वच्छ करा. हा रिचार्जेबल आहे.

फ्लोअर क्लिनिंगसाठी इलेक्ट्रिक स्पिन मॉप  हे आधुनिक आणि सोयीस्कर साफसफाईचे साधन आहे. यामध्ये पाणी स्प्रे करण्याची सुध्दा सुविधा आहे म्हणजे आपल्याला वारंवार फरशीवर पाणी टाकावे लागत नाही. हा सर्व प्रकारच्या फरशीवर वापरता येतो जसे की मार्बल, व्हिट्रीफाईड, लॅमिनेटेड इत्यादी. याची जवळपास २०० मि.ली. इतकी पाणी साठविण्याची  क्षमता आहे. याच्या तळाला दोन पॅड असतात. मॉप सुरु केल्यावर हे दोन्ही पॅड फिरू लागतात. या दोन्ही पॅड्सचा फिरण्याचा वेग साधारण १५० rpm इतका आहे जेणेकरून फरशी  अगदी स्वच्छ होईल. याचं हॅन्डल आणि दांडा उचित डिझाईनचे आहेत. दांडा आपल्या उंचीनुसार किंवा गरजेनुसार अड्जस्ट करता येतो. तसेच सोफा किंवा टेबलसारख्या वस्तूंच्या खालूनसुध्दा अतिशय सफाईदारपणे सफाई करता येते.

 आता फरशी मोप करण्यासाठी कोणते उपाय? असे जर कोणी विचारले तर आपण बेधडक ‘इलेक्ट्रिक स्पिन मॉप‘ असे उत्तर देऊ शकतो

या मॉपसोबत एक मेन युनिट, दोन एक्स्ट्रा पॅड्स आणि एक मेजरींग कप येतो. तसेच यासोबत एक वर्षाची वॉरन्टीसुध्दा मिळते.

अतिशय उपयुक्त असे हे गॅजेट आपल्या घरी असायलाच हवे. इथे क्लिक करून तुम्ही आत्ताच हे मागवू शकता.

electric floor cleaning mop
electric spin mop

शूज स्वच्छ करणारा फोम (फेस)|Shoes cleaning foam

शूज!!! प्रत्येकाची अगदी पर्सनल गोष्ट, पण असायलाच हवी  अशी. खास करून जे व्यायाम करतात त्यांच्यासाठी. पण हे शूज स्वच्छ करणे म्हणजे एक कामच असत. आपण खूप धडपड करून ते स्वच्छ करायचा प्रयत्न करतो पण ते बेटे म्हणावे तसे स्वच्छ होतच नाहीत. पण आता आपली ही काळजी मिटली कारण आता आला आहे फोम बेस्ड शु केअर कीट.

हल्ली आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्यायाम करायची, पाळायला जायची किंवा चालायला जायची सवय असते. खरंतर व्यायाम करणे ही खूपच छान सवय आहे, परंतु ते खराब झालेले बूट पाहून बऱ्याचदा आपला विरस होतो. फिरायला जायचं तर बूट हे हवेतच आणि बूट लागणार म्हणजे त्यांची स्वच्छता आलीच. चला तर मग आपण जाणून घेऊया बूट स्वच्छ करणारा फेस किंवा आपण त्याला फोम म्हणू.

शू क्लीनिंग फोम हा एक प्रकारचा साफसफाई उत्पादन आहे जो विशेषतः शूज साफ करण्यासाठी आणि त्यांची स्वच्छता राखण्यासाठी डिझाइन केला आहे. हे सामान्यत: फोम किंवा एरोसोल स्वरूपात येते.  हे स्नीकर्स, लेदर शूज, स्पोर्ट्स शूज आणि  यासह विविध प्रकारच्या पादत्राणांमधून घाण, डाग आणि स्कफ मार्क्स काढून टाकण्यासाठी तयार केले जाते.

फोममध्ये अनेकदा क्लिनिंग एजंट्स, कंडिशनर्स आणि कधीकधी वॉटर रिपेलेंट्सचे मिश्रण असते. हे फेसच्या स्वरूपात असल्यामुळे  बुटामध्ये प्रवेश करण्यास मदत करते आणि  घाण,काजळी इत्यादी प्रभावीपणे काढून टाकते. हे वापरणे सोयीस्कर आहे कारण त्याला सहसा अतिरिक्त पाण्याची आवश्यकता नसते आणि तुम्ही ते थेट बुटाच्या पृष्ठभागावर लागू करू शकता.

हा फोम वापरण्यास अतिशय सोप्पा आहे आणि झटपट परिणाम देतो. हट्टी डागांवर प्रतिक्रिया देण्यासाठी आणि त्यांना अत्यंत सहजतेने स्वच्छ करण्यासाठी शू क्लिनर विशेष फॉर्म्युलेशनने बनलेले आहे. शू क्लिनरचा वापर रंगीत स्नीकर्स, स्पोर्ट्स शू किंवा पीयू शूजवर देखील केला जाऊ शकतो.

हा फोम वापरून अगदी लहान मुले देखील बूट स्वच्छ करू शकतात.

हा इन्स्टा क्लीन असल्यामुळे एक मिनिटामध्ये आपले बूट स्वच्छ होतात.

यांच्यामध्ये शू डिओडोरायझर असल्यामुळे दीर्घकाळ टिकणारा सुगंध मिळतो.

इथे क्लिक करून हा फोम आत्ताच खरेदी करू शकता.

वॉटरमेलन कटर | Watermelon Cutter| Watermelon Windmill Slicer

आला उन्हाळा ! आला उन्हाळा ! आरोग्य सांभाळा.  खरंय उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते, एकतर उन्हाळ्यात आपल्याला जास्त भूक लागत नाही त्यात शरीराला सतत थंड ठेवावे लागते आणि त्यासाठी  आपल्याला पाणीदार फळे खावी लागतात परंतु ती कापणे खूपच वेळखाऊ असते त्यासाठी आता आला आहे वॉटरमेलन कटर. याच्यामध्ये विंडमिल ऑटोमॅटिक कटर असतो.

या स्लाइसरला कलिंगडामध्ये थोडंसं पुढे ढकलायचं आणि यामधून कलिंगडाचे चौकोनी ठोकळे आपोआप बाहेर येतात, कसलं छान ना ? हात खराब न करता मस्त कलिंगडाचे चौकोन तयार. हे विंडमिल कलिंगड स्लायसर वापरून तुम्ही एका मिनिटात  कलिंगडाचे  सॅलड बनवू शकता, खायला घेऊ शकता, ज्यूस बनवू शकता आणि तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने वापरू शकता.

कलिंगड खाणं कितीही मजेदार असलं तरी ते कापण्यासाठी सहसा कोणी तयार नसतं, परंतु या कटरने आपले कलिंगड कापण्याचे काम एकदम सोपे करून टाकले आहे. यामध्ये आपल्याला कलिंगडाचे सुबक आकाराचे चौकोन मिळतात त्यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसतात.  त्या चौकोनी ठोकळ्यांना तुम्ही काट्या चमच्याने खाऊ शकता किंवा टूथ पीक च्या साहाय्याने देखील खाऊ शकता. घरी जर पाहुणे येणार असतील तर असे चौकोनी ठोकळे तुम्ही टूथ पीक लावून सजवून ठेऊ शकता.

याचे विंडमिल हे नाव अगदी सार्थ आहे कारण विंडमिल म्हणजेच पवनचक्की प्रमाणे याची पाती असतात आणि कलिंगड सफाईदारपणे कापण्याचे काम ते करतात. किती लहान वा मोठे चौकोनी तुकडे करायचे ते आपण स्लाईसर ऍडजस्ट करून ठरवू शकतो. यामध्ये आतला भाग एकदम गुळगुळीत  असतो त्यामुळे आपण कलिंगडाचे तुकडे सहजपणे काढू शकतो.

या स्लाईसरच्या कडा गोलाकार आणि तीक्ष्ण नसलेल्या आहेत त्यामुळे हा स्लाईसर मुलांनी वापरण्यास देखील अतिशय सुरक्षित आहे. हे  टरबूज वर्गीय फळे म्हणजे टरबूज,खरबूज इत्यादी कापण्यासाठी अतिशय योग्य साधन आहे.

याचे विंडमिल हे नाव अगदी सार्थ आहे कारण विंडमिल म्हणजेच पवनचक्की प्रमाणे याची पाती असतात आणि कलिंगड सफाईदारपणे कापण्याचे काम ते करतात. किती लहान वा मोठे चौकोनी तुकडे करायचे ते आपण स्लाईसर ऍडजस्ट करून ठरवू शकतो. यामध्ये आतला भाग एकदम गुळगुळीत  असतो त्यामुळे आपण कलिंगडाचे तुकडे सहजपणे काढू शकतो.

या स्लाईसरच्या कडा गोलाकार आणि तीक्ष्ण नसलेल्या आहेत त्यामुळे हा स्लाईसर मुलांनी वापरण्यास देखील अतिशय सुरक्षित आहे. हे  टरबूज वर्गीय फळे म्हणजे टरबूज,खरबूज इत्यादी कापण्यासाठी अतिशय योग्य साधन आहे.

खरबूज, टरबूज इत्यादी प्रकारची फळे सफाईदारपणे कापण्यासाठी अतिशय उत्तम असे हे साधन आपल्याकडे असलेच पाहिजे. चला तर मग इथे क्लिक करून तुम्ही आजच मागवा हे वॉटरमेलन कटर.

युनिव्हर्सल फोन होल्डर

आज मी तुमच्यासाठी एक मस्त आणि स्वस्त असे एक उपकरण आणले आहे ज्याची आपणासर्वांना खूप गरज आहे.

आजकाल आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य झालेला मोबाईल फोन आपण एक मिनिट देखील सोडू शकत नाही परंतु हातात सतत मोबाइल ठेवणे  शक्य नसते  त्यामुळे आपल्याला काम करताना मोबाईल बघता येत नाही. आता ही काळजी मिटली कारण युनिव्हर्सल फोन होल्डर खूपच मस्त उपकरण आहे.

ते आपण  गळ्यात घालून त्यात मोबाईल ठेवून बघू शकतो, किंवा टेबलवर ठेऊ शकतो किंवा आपल्या सायकल वा बाईकला लावून गूगल मॅप लावून पाहू शकतो. तर अशा या उपकरणाचे बरेच फायदे आहेत. आपण ते हवे तसे वाकवू शकतो, हवे तिथे ठेऊ शकतो.

याचे डिझाईन खूपच स्मार्ट पध्द्तीने बनविलेले आहे. हे आपण ३६० अंशात किंवा आपल्याला हव्या त्या अँगल मध्ये  फिरवू शकतो शिवाय आपले डोळे आणि स्मार्ट फोन मध्ये योग्य अंतर राखू शकतो, जेणेकरून आपल्या डोळ्यांना मोबाईल पाहण्याचा त्रास होणार नाही. याला आपण हवे तसे वाकवू शकल्याने हवा तो आकार देऊ शकतो ज्यामुळे मोबाईल बघणे आपल्याला अत्यंत सोयीचे होईल.

हे ७०% अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या मिश्रधातूंपासून बनलेले आहे. याची स्थिरता उत्तम आहे. याला अँटी स्किड आणि शॉकप्रूफ ब्रिदेबल फोम असल्याने गळ्यात घातल्यास मानेला त्रास होत नाही.

फोन पाहण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, संगीत आणि व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी, GPS डिव्हाइस धारण करण्यासाठी, बेडरूममध्ये फोन गेम खेळण्यासाठी, कार, मेट्रो, बस, सायकल, ट्रेन, विमान, जिम, ऑफिस, वर्ग, पार्क, प्रदर्शन इत्यादीसाठी अतिशय योग्य असा हा युनिव्हर्सल फोन होल्डर प्रत्येकाकडे असलाच पाहिजे. चला तर मग इथे क्लिक करून आत्ताच मागवा हा युनिव्हर्सल फोन होल्डर.

इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश

आपल्या आयुष्यात स्वच्छतेचं काय महत्व आहे हे कोविड-१९  मध्ये आपल्याला पूर्णपणे पटलेलं आहे. मग ते घर असू दे, ऑफिस असू दे किंवा कोणतीही वस्तू असू दे, त्याची स्वच्छता ठेवणे अगदीच गरजेचे आहे. या आधी सुध्दा आपण स्वच्छतेची विविध यंत्रे पहिली जसे की साफसफाई करणारा रोबो, जाळी साफ करणारा ब्रश, गाडी आतमधून स्वच्छ करणारा फोम इत्यादी त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश. आता बाजारात अनेक प्रकारचे, आकाराचे आणि वेगवेगळ्या साहित्यापासून बनविलेले ब्रश मिळतात, मग असं काय विशेष आहे या ब्रश मध्ये ? तर हा ब्रश इलेक्ट्रिक आहे म्हणजे आपले कष्ट थोडे कमी करणारा आहे. आता पूर्वीसारखी कष्टाची कामे करण्याची कोणाला सवय आणि गरज राहिलेली नाही परंतु जेव्हा गोष्ट स्वच्छतेची असते आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपली शक्ती वापरावी लागते जे की आजच्या काळात फारच त्रासदायक वाटते. मग यावर उपाय म्हणून हा इलेक्ट्रिक ब्रश आलेला आहे. हा ब्रश आपले काम आणि वेळ वाचवतो आणि स्वच्छतापण चांगल्या पद्धतीने करतो.

हा आपण भांडी घासायला, किचन कट्टा स्वच्छ करायला, फारशी एकदम स्वच्छ करायला वापरू शकतो. तसेच याने आपण गाडी स्वच्छ करणे, पॉलिश करणे इत्यादी कामेदेखील करू शकतो.  

या पॉवर स्क्रबरमध्ये मेटल गीअर्स आहेत. जेव्हा तुम्ही घाण आणि कठीण डाग साफ करण्यासाठी इलेक्ट्रिक स्क्रबरवर दबाव टाकता तेव्हा ते अचानक काम करणे थांबवत नाही, त्यामुळे व्यवस्थित साफ करणे खूप सोपे आणि प्रभावी होते. या कॉर्डलेस स्क्रबरमध्ये 3 अदलाबदल करण्यायोग्य ब्रशेस आहेत जे तुम्हाला विविध प्रकारचे पृष्ठभाग सहजतेने स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. या ब्रशेस मध्ये स्वच्छता करण्याची प्रचंड ताकद आहे. त्यामुळेच तेलकट झालेली गॅसची शेगडी असो किंवा फरशीवर पडलेले चिवट डाग असोत हा ब्रश एकदम आराम स्वच्छ करू शकतो. बाथरूम स्वच्छ करण्यामध्ये सुध्दा आपली बरीच शक्ती खर्च होत असते तिथे देखील हा ब्रश वापरून आपण आपले कष्ट वाचवू शकतो. याशिवाय आपण शॉवर वॉल, सिंक, गाडीची अतिशय घाण झालेली चाके किंवा बाथटब देखील एकदम स्वच्छ चकचकीत करू शकतो.

६० ते १०० मिनिटे सलग चालविण्यासाठी आपल्याला याचे फक्त दोन तास चार्जिंग करावे लागते.   अत्यंत सीलबंद, वॉटरप्रूफ  डिझाइनमुळे ते ओल्या ठिकाणी, जसे कि बाथरूम , सुध्दा नीट वापरता येते.

खरंच हा ब्रश प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे कारण एखाद्या ठिकाणी घाण दिसतीये तर ती पटकन काढून टाकता येईल नाहीतर आपल्याला काम करण्याचा उत्साह येईपर्यंत किंवा कामवाल्या मावशी येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. तुम्ही  इथे क्लिक करून आत्ताच हा ब्रश मागवू शकता.

जीपीएस ट्रॅकर | GPS Tracker

जीपीएस ट्रॅकर !!! हा शब्द आता आपल्यासाठी नवीन राहिला नाही. हल्ली सर्वांकडे स्मार्ट फोन असतो आणि त्यात जीपीएस असतोच आणि आपण तो कधी ना कधी वापरलेला असतो. परंतु आता आले आहे एक नवीन यंत्र जे आपण आपल्या गाडीत ठेवू शकतो आणि आपली गाडी कधीही ट्रॅक करू शकतो. खरतर हे डिव्हाईस खूपच उपयोगी आहे. हल्ली सगळीकडे असुरक्षितता निर्माण झाली आहे, आणि त्या दृष्टीने पाहता हे यंत्र सर्वांकडे असायलाच हवे.

अत्यंत संवेदनशील GPS चिप आणि क्लाउड सर्व्हर वापरून तुमच्या स्मार्ट फोनवर आपल्या वाहनाची रिअल टाइम हालचाल पाहू शकतो. यामध्ये एक इन्स्टंट अँटी थेफ्ट अलार्म असतो जो आपण आपल्याला हवा तेव्हा ऑन करू शकतो, आणि जर का आपले वाहन चोरण्याचा प्रयत्न झाला तर  तो लागेचच सुरु होतो आणि वाहनांची चोरी टाळता येते. यामध्ये आपण सर्व ट्रॅकिंग आपल्या स्मार्ट फोनवर करू शकतो. याचे एक सर्वांत  महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण इमर्जन्सीअधे मोबाईलच्या साहाय्याने वाहन बंद करू शकतो.  म्हणजे समजा जर का वाहन चोरीला गेले तर आपण मोबाईलच्या साहाय्याने ट्रॅक तर करूच शकतो आणि वाहन बंद देखील करू शकतो.

यामध्ये ९० दिवसांचा डेटा साठवून ठेवता येतो म्हणजे आपण आधीचा डेटादेखील पाहू शकतो. लाइव्ह इग्निशन ऑन/ऑफ अलर्ट, ओव्हर-स्पीडिंग अॅलर्ट, एंट्री आणि एक्झिट पॉईंट्सवर अॅलर्ट, रिअल टाइममध्ये निष्क्रियतेचे मॉनिटर आणि बरेच फीचर्स यामध्ये आहेत जे खूपच उपयोगी आहेत. आपण यामध्ये भौगोलिक कुंपण सेट करु शकतो.  नकाशावर सुरक्षित क्षेत्रे ठरवू शकतो  आणि जेव्हा वाहन त्या झोनमध्ये प्रवेश करते/बाहेर जाते तेव्हा सूचना मिळवू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण हे डिव्हाईस आपल्या  मुलांच्या सुरक्षेततेसाठी  त्यांच्या बॅगेत ठेवू शकतो आणि त्यांच ट्रॅकिंग करू शकतो.

असे हे नवीन डिव्हाईस जे की आत्ता पर्यंत हजारो लोकांनी वापरलय आणि वापरत आहेत ते आपल्याकडे पण असलेच पाहिजे, कारण आत गाडी असणे ही श्रीमंती राहिली नसून गरजेची गोष्ट झाली आहे आणि त्याची सुरक्षा करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या सुरक्षिततेसाठी देखील आपण हे घेतले पाहिजे.

चला तर मग इथे क्लिक करा आणि आत्ताच मागवा हे जीपीएस ट्रॅकर यंत्र

कपड्यांचा लिंट किंवा फॅब्रिक शेव्हर | Lint/Fabric Shaver for Cloths

कपडे !!! आपल्या किती जिव्हाळ्याचा विषय ना ? विशेषतः स्त्रियांच्या. आपण हे कपडे किती जपतो ना? प्रत्येक कपड्यामध्ये आपल्या किती आठवणी गुंफलेल्या असतात, आपला प्रत्येक कपडा काहीतरी गोष्ट सांगत असतो जी फक्त आपल्यालाच माहित असते उदाहरणार्थ हा त्या ५०% सेल मध्ये घेतलेला, हा बघताक्षणीच आवडलेला, हा मोठ्या मॉलमधून घेतलेला इत्यादी, काही कपड्यांसोबत आवडत्या व्यक्तींच्या आठवणी असतात म्हणजे आपल्या बाळाचे छोटे छोटे कपडे,  मुलीने घेतलेला पहिला कपडा  इत्यादी इत्यादी. या आणि अशाच गोष्टी आपल्या कपड्यांशी निगडित असतात त्यामुळेच आपण जरी नवीन कपडे घेतले तरी जुन्या आठवणींच्या कपड्याना प्राणपणाने जपत असतो, परंतु काही कपडे असे असतात की थोडे दिवसांनी त्यांच्यावर गोळे येतात आणि ते छान दिसत नाहीत मग घालावेसे पण वाटत नाहीत. आपलं खूप मन असत एखाद्या समारंभाला किंवा पार्टीला एक विशिष्ठ कपडाच घालायचा पण नेमके त्यावर गोळे आलेले असतात, मग अशावेळी काय करायचं? पण आता काळजी नको कारण आता आला आहे कपड्याना  नवीन सारखं बनविणारा लिंट फॅब्रिक शेवर.

Lint remover

या लिंट रिमूव्हरने  आपण आपले जुने कपडे आणि फॅब्रिक्स पुनर्संचयित म्हणजे पुन्हा नव्यासारखे करू शकतो. हे कॉर्डेड लिंट रिमूव्हर तुम्हाला तुमच्या कपड्यांमधून लिंट, गोळे, बुरशी आणि बबल सहज काढण्यास मदत करते. हे वापरायला अतिशय सोपे आहे, बस प्लगला लावा आणि आपल्याला हव्या असलेल्या कपड्यावर हळुवारपणे फिरवा, झालं. हळू हळू सगळे गोळे निघून जातील आणि कपडा अतिशय स्वच्छ आणि नवा वाटू लागेल. अडजस्टेबल हाईट स्पेसर तुमच्या कपड्यांना कापले जाण्यापासून किंवा घासण्यापासून किंवा अडकले जाण्यापासून वाचवते. हे तुमचे हात चुकून शेव्हर फॉइलला स्पर्श करण्यापासून संरक्षण करते. तुम्हाला तुमचे उपकरण वापरल्यानंतर सहज स्वच्छ करण्यात मदत करण्यासाठी पॅकमध्ये क्लिनिंग ब्रश समाविष्ट केला आहे.

स्वेटर, वूलन्स, ब्लँकेट, स्पोर्ट्सवेअरसाठी योग्य असलेल्या फॅब्रिकमधून लिंट सहजतेने काढून टाकते. यामध्ये लिंट गोळा होणारी  पेटी आणि चाकू वेळेवर स्वच्छ करावा लागतो.  याचं फॅब्रिक उत्कृष्ट आहे तसेच हे  ग्रूमिंग टूल टिकाऊदेखील आहे.

हे पोर्टेबल असल्यामुळे सहजपणे आपल्या बॅगमध्ये मावते. हे  हलके आहे आणि याचे  हँडल डिझाइन  मोहक आहे. स्किड-प्रूफ डिझाइनमुळे  ऑपरेट करणे सोपे होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 100% शॉकप्रूफ आहे.

याचा वापर आपण आपले कपडे, स्वेटर्स, ब्लँकेट्स, चादरी, गालिचे, जॅकेट्स इत्यादींसाठी करू शकतो. एवढे उपयोगी यंत्र घरी असलेच पाहिजे. इथे क्लिक करा आणि आत्ताच ऑर्डर करा लिंट रिमूव्हर.

मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट |Multicolour Smart LED Strip Kit

तुम्हाला जर सांगितलं कि आपण घरात  वेगवेगळ्या १६ दशलक्ष रंगांचे दिवे लावू शकतो तर तुम्ही नक्कीच वेड्यात काढाल , हो ना ? पण हे खरंच शक्य झालय मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट मुळे. विश्वास ठेवणं अवघड वाटतंय ? चला तर मग पाहूया हे नक्की काय आहे ते.

आपले घर सुंदर असावे असं कोणाला नाही वाटत? त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वस्तू आणतो, घराला सुंदर रंगानी सजवतो, पडदे लावतो, सुंदर रंगांचे दिवे असणारी झुंबरं आणतो आणि बरच काही करतो. आता यामध्ये विशेषतः रात्री साठी आपल्याला सजावट करायची असेल तर वेगवेगळ्या रंगांचे दिवे लावणे आलेच परंतु लावून लावून किती रंगांचे दिवे लावणार ? यासाठी मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट घेऊन आले आहे एक स्मार्ट सोल्युशन. हे दिवे  एल इ डी आहेत आणि ते रंग बदलणारे आहेत. त्यामध्ये आपण १६ दशलक्ष प्रकारच्या रंगांचे  कॉम्बिनेशन करू शकतो आणि आपल्या मूड प्रमाणे आपले घर सजवू शकतो.

या १६ दशलक्ष रांगांमधून आपल्याला हवा तो रंग आपण निवडू शकतो आणि यातला प्रत्येक रंग पाहिजे तेवढा अंधुक देखील करता येतो. यामध्ये आपल्याला हव्या त्या मूड मध्ये लाईट सेट करता येतात जस कि सिनेमा बघण्यासाठी, पार्टी करण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी, वाचनासाठी इत्यादी. यामुळे कोणतीही गोष्ट करण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार करता येते.

 स्मार्ट एलईडी लाइट स्ट्रिप अॅमेझॉन इको डिव्हाइसेस आणि गुगल असिस्टंटशी  सुसंगत आहे. म्हणजे आपण फक्त तोंडी सूचना देऊन त्यातले लाईट्स बंद / सुरु करू शकतो आणि हवे तसे डिम किंवा ब्राईट करू शकतो याशिवाय आपण त्यातले रंग सुध्दा फक्त तोंडी सूचना देऊन बदलू शकतो. साधे संभाषण किंवा स्मार्ट फोन वापरून परिपूर्ण वातावरण सेट करा, लाईट बंद करण्यासाठी तुम्हाला तुमचा  पलंग  सोडण्याची गरज नाही.

याशिवाय यामध्ये आपण ठराविक वेळेला दिवे सुरु बंद व्हावेत अशी सेटिंग करू शकतो. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण ऑफिसमधून घरी येतो त्यावेळेस दिवे सुरु होण्याची सेटिंग केली तर घरी यायला सुध्दा किती छान वाटेल ना! हे स्मार्ट दिवे आहेत त्यामुळे ते मोबाईल अँप वापरून देखील आपण कंट्रोल करू शकतो त्यामुळे घराच्या बाहेर असताना देखील आपण ते सुरु किंवा बंद करू शकतो. म्हणजे आता घरच्या बाहेर असताना घरात दिवे सुरु राहिले का हे टेन्शन येणार नाही.

 हे एल ई डी दिवे असल्याने ते आधीच विजेची बचत करतात आणि त्यातसुध्दा आपण कमी वीज वापरण्याची सेटिंग करू शकतो म्हणजे आपोआप पैशाची देखील बचत होते. हे आपण एकट्याने वापरू शकतो किंवा घरातील सदस्यांसोबत ग्रुपमध्ये देखील वापरू शकतो.  हे स्मार्ट  एल ई डी वापरण्यासाठी कोणत्याही वेगळ्या हब ची गरज नाही आपल्या घरातल्या नेटवर्क ला आपण सहज कनेक्ट करू शकतो.

याशिवाय आपण आपल्या आवडत्या म्युझिकवर सुध्दा ह्यांचे रंग बदलवू शकतो म्हणजे आपल्या म्युझिकवर हे दिवे नाच करतील आणि आपल्या घराला आपण डान्स फ्लोअर बनवू शकतो किंवा शांत म्युझिक लावून शांत रंग निवडून आपण आरामशीर आणि शांत वातावरण तयार करु शकतो. दीर्घ दिवसानंतर आराम करण्याचा किंवा तुमच्या मुलांना झोपण्याची वेळ एक आनंददायक अनुभव देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

इतके सगळे सुंदर फीचर्स असताना वाट कसली बघायची आत्ताच ऑर्डर करूया हे मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट. बस इथे क्लिक करा आणि आत्ताच मागवा.

प्रोजेक्टर अलार्म क्लॉक | Projector Alarm Clock

लहानपण किती छान असतं ना ! कसलंही टेन्शन नाही, कसलीही जबाबदारी नाही, एवढच काय तर सकाळी जाग येईल की नाही याची काळजी नाही, हो कारण सकाळी उठवायला आई असतेच ना. पण मोठं झाल्यावर सकाळी वेळेत जाग येण्याची जबाबदारी पण आपलीच , ह्याकाय हे जीवन ? हा फार फार तर आपण आपल्या मोबाईलवर सकाळचा अलार्म लावू शकतो पण आपण एकच अलार्म लावून नाही थांबत, दोन ते तीन तरी लावतोच मग तो अलार्म वाजल्यावर नक्की किती वाजलेत हे स्वतः उठून पाहिल्याशिवाय नाही समजत. मग यावर उपाय काय ? आहे ना. हे  आपले  प्रोजेक्टर अलार्म क्लॉक,  हे यंत्र आपल्याला वेळ अगदी बोलून सांगते. त्याच प्रमाणे रात्रीच्यावेळी त्यावरून वेळ प्रोजेक्टर प्रमाणे भिंतीवर किंवा छतावर देखील दाखवते. आहे की नाही गम्मत?

आपण बटण दाबले कि वेळ इंग्लिश मध्ये बोलून दाखविली जाते तसेच १० सेकंदांसाठी ती वेळ सपाट पृष्ठभागावर प्रोजेक्ट केली जाते. प्रोजेक्शन टाइम पॅटर्न प्रासंगिकपणे हलवू देण्यासाठी प्रोजेक्शन हेड पुढे आणि मागे हलवता येते. याची एलसीडी स्क्रीन 52 मिमी व्यासाची आहे त्यामुळे त्यावर वेळ, तापमान, अलार्म चिन्हे स्पष्टपणे मोठ्या आकारात दिसतात व आपल्याला ते पाहणे सोपे होते.

बॅटरी तळाशी  ठेवली आहे त्यामुळे ती दिसत नाही, ते अद्वितीय आणि सर्जनशील दिसते, तुमच्या घराची, ऑफिसची, कारची सर्वोत्तम आधुनिक सजावट, हलकी आणि संक्षिप्त, प्रवासासाठी देखील आदर्श आहे.

प्रोजेक्टर क्लॉक  भिंतीवर किंवा छतावर अल्ट्रा-क्लीअर टाइम प्रोजेक्ट करू शकते आणि वेळेचे स्पष्ट आणि मस्त दृश्य एन्जॉय करू शकते.

वेळ आणि तारीख आपल्याला हव्या त्या स्वरूपात आपण अड्जस्ट करू शकतो. आपण ते कुठेही ठेवू शकतो जसे की अभ्यासाची खोली, बेड रूम, डेस्क. याचा अलार्म 10 मिनिट स्नूझ फंक्शनसह येतो.

अशा आधुनिक पध्द्तीचे अलार्म क्लॉक आपल्या कडे असलेच पाहिजे. इथे क्लिक करा आणि आत्ताच मागवा हे प्रोजेक्टर अलार्म क्लॉक.

सेव्हन इन वन इलेक्ट्रिक प्रेशर कुकर | 7-in-1 Electric Pressure Cooker

प्रेशर कुकर आणि इलेक्ट्रिक !!! व्वा. कसली मस्त संकल्पना आहे ना ? होय संकल्पना पण मस्त आहे आणि तो वापरून जेवण बनविणे देखील मस्त आहे. गॅसच्या वाढणाऱ्या किमती आणि त्याची असणारी कमतरता पाहता हा इलेकट्रीक कुकर खरंच एक उपयोगी यंत्र आहे. हा स्वयंपाक घरातील ७ वेगवेगळ्या उपकरणांचे एकत्रीकरण आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी वेगवेगळी साधने वापरण्याची गरज नाही. याला न्यूट्री-पॉट असेदेखील म्हणतात. या न्यूट्री-पॉटमध्ये भारतीय आणि विदेशी खाद्यपदार्थ आपण अगदी सहजगत्या बनवू शकतो. आपल्याआवडीचे खाद्य पदार्थ एका बटणाच्या क्लिक वर आपण बनवू शकतो. याच्या स्वयंचलित ऑपरेशन्समुळे  नवशिक्यासाठी स्वयंपाक करणे खूप सोपे आणि सोयीस्कर बनते. यामध्ये स्टीमर, स्लो कुकर, फोडणी इत्यादी १८ प्रकारचे प्री-सेट फंक्शन्स आहेत त्यामुळे स्वयंपाक करणे आता सोपे झाले आहे.

Electric Pressure Cooker

न्यूट्री-पॉट बुद्धिमान मायक्रो कॉम्प्युटरने सुसज्ज आहे जे तुम्ही निवडलेल्या डिशच्या गरजेनुसार प्रोग्राम केलेले आहे. हे तापमान आणि दाब इष्टतम पातळीवर ठेवते आणि आपल्याला परिपूर्ण डिश बनविण्यात मदत करण्यासाठी गरम करण्याची तीव्रता समायोजित करत राहते. न्यूट्री-पॉट तुमचा रोजचा स्वयंपाक अत्यंत सोयीस्कर बनवते. न्यूट्री-पॉटसह कोणीही शिजवू शकतो आणि प्रत्येक वेळी परिपूर्ण परिणाम मिळवू शकतो. तुम्ही प्रो किंवा कुकिंगच्या जगात नवशिक्या असाल, एक टच कुकिंगसह न्यूट्री-पॉट तुमचा किचन पार्टनर आहे.

या न्यूट्रिपॉटमध्ये स्वयंपाकाचे साहित्य टाका, स्वयंपाकाचे फंक्शन निवडा आणि किचन मधून निघून जा , बाकीचं सगळं हा न्यूट्रिपॉट बघेल. तुम्ही परत आल्यानंतर तुमच्या आवडीचा पदार्थ एकदम गरमागरम तयार असेल. याची बांधणी उत्कृष्ट आहे , आणि याच्या कंट्रोल्ड प्रेशरमुळे हा वापरण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. याची सिलिकॉन रिंग विलग करता येते तसेच सेफ्टी व्हॉल्व्हसह, झाकण आणि आतील भांडेदेखील स्वच्छ करणे सोपे आहे. या  न्यूट्री-पॉटमध्ये एक डीले टाइमर नावाची जादू आहे. आपण आपल्या सोयीनुसार स्वयंपाक सुरू करण्यासाठी आपले न्यूट्री-पॉट प्रोग्राम करू शकतो जेणेकरुन अन्न वेळेवर तयार होईल आणि गरमही राहील, सर्व्ह करण्यापूर्वी अन्न पुन्हा गरम करण्याचा आपला त्रास वाचेल. आपण तो टायमर 30 मिनिट ते 24 तासांच्या दरम्यान कुठेही  सेट करू शकतो. न्युट्री-पॉट लिडची अनोखी लॉकिंग सिस्टीम अन्नाच्या आतील सर्व पोषण लॉक करते त्यामुळे प्रत्येक वेळी आरोग्यदायी अन्नाची खात्री मिळते.

यामध्ये आपण अगदी सध्या भातापासून , पुलाव पर्यंत किंवा नुसता खिचडी भात किंवा बिर्याणी पर्यंत, मटण करीपासूनकेक पर्यंत वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो.

असा हा बहुगुणी इलेक्ट्रिक प्रेशर कुकर प्रत्येक मॉडर्न घरामध्ये असायलाच हवा आणि तो इथे क्लिक करून तुम्ही आत्ताच ऑर्डर करू शकता.        

Exit mobile version