नारळ हा पारंपरिक भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. मग ते संपूर्ण शाकाहारी जेवण असू दे नाहीतर मांसाहारी, खोवलेला नारळ म्हणजेच खोबरे हे असलेच पाहिजे. पण खोबऱ्याची चव कितीही मधुर असली तरी ते काढणे तसे बरेच कष्टाचे असते. पूर्वी नारळ खोवण्यासाठी घरात विळी असायची अजूनही भारतीय घरांमध्ये विळी असतेच परंतु हल्लीची जीवनपद्धतीमुळे आणि वेळेच्या कमतरतेमुळे खाली बसून विळीवर खोबरे खोवायला आपल्या बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही त्यामुळे इच्छा असूनसुध्दा आणि खोबरे खाण्याचे बरेच फायदे माहित असून सुध्दा हल्ली बहुतांश घरांमध्ये जेवणात खोबरे दिसत नाही.
परंतु आता किचनच्या ओट्याला लावता येणारे नारळ खोवायचे यंत्र आले आहे. त्यामुळे उभे राहून खोबरे खोवणे झाले आहे एकदम सोप्पे. तसेच याचे जे स्टॅन्ड आहे त्याला आपण शेवेचा किंवा चकलीचा सोऱ्या देखील लावू शकतो आणि चकली बनवायचे काम सुध्दा सोपे होऊन जाते.
कोकोनट स्क्रॅपरमध्ये सामान्यतः तीक्ष्ण, वक्र ब्लेड असते जे हँडलला जोडलेले असते. किचन प्रेस होल्डर स्टँड हे एक स्टँड आहे जे किचन प्रेससाठी वापरले जाते. हे स्टँड प्रेसला स्थिर ठेवण्यास आणि वापरत असताना ते जागी ठेवण्यास मदत करते. हे स्टॅन्ड आपण ओट्याला किंवा टेबलाला किंवा कुठे लावू शकतो आणि आरामात नारळ खोवू शकतो.
शेवया किंवा चकलीचा साचा लावायच्या स्टॅण्डमुळे तर आपले काम अर्धे होऊन जाते. सामान्यतः चकली किंवा शेवया करताना आपल्याला दोन कामे एकत्र करावी लागतात , एक म्हणजे तो साचा हातात पकडणे आणि दुसरे म्हणजे तो वरून गोल फिरवणे परंतु आता या यंत्राच्या सहाय्याने साचा हातात पकडायचे काम सोपे होते कारण तो आपण त्या स्टॅंडलाच लावणार असतो.
या स्टँडला पावडर कोटिंगचे सात थर आहेत त्यामुळे हे गंजत नाही. वापरायला एकदम सुटसुटीत आहे. एका स्टॅण्डमध्ये दोन गोष्टी करता येतात, नारळ खोवणे आणि शेवया करणे. याची स्वच्छता करणे देखील एकदम सोपे आहे.
चला तर मग असे हे अत्यंत उपयुक्त नारळ खोवायचे यंत्र मागवा आणि तुमचे जेवणाला स्वादिष्ट बनवा. इथे क्लिक करून तुम्ही हे यंत्र आत्ता मागवू शकता.