डिशवॉशर हे मशीन आता आपल्याला नवीन राहिलेलं नाही. ज्याप्रमाणे कपडे धुण्याचे वॉशिंग मशीन हे आधी चैनीची गोष्ट होती आणि नंतर ती गरजेची बनली त्याप्रमाणे भांडी धुण्याचा डिशवॉशर देखील हल्ली गरजेचा बनला आहे.
लॉकडाऊनच्या काळात तर जादू केल्याप्रमाणे सिंक मध्ये भांड्यांचा ढीग सतत असायचा. हल्लीचे धावपळीचे आयुष्य, कामवाल्या मावशींच्या अचानक घेतलेल्या सुट्ट्या, भांडी व्यवस्थित न घासणे इत्यादी गोष्टींनी हल्लीच्या गृहिणी त्रासलेल्या असतात, त्यावर एक अतिशय उत्तम पर्याय म्हणजे डिशवॉशर.
कितीही भांडी असुद्या, अचानक पाहुणे आल्यामुळे वाढलेला भांड्यांचा ढीग असू द्या हा डिशवॉशर निमूटपणे काम करतो.
‘डिशवॉशर’ आपण नाव ऐकलेलं असतं, आपल्या काही मैत्रिणींकडेअसतो सुध्दा पण तरीसुध्दा आपल्याला समजत नसत कि खरोखर हा आपल्या भारतीय पद्धतीच्या जेवणाची भांडी नीट धुतो का ? तर याचे उत्तर म्हणजे हो, कितीही मसाले वापरलेली भांडी असू देत हा अतिशय स्वच्छ धुतो. आपल्या भारतीय जेवणांमध्ये विविध प्रकारचे मसाले, ग्रेव्ही, फोडण्या असतात त्यामुळे भांड्यांचा वास जाण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला भांड्यांमध्ये गरम पाणी घालून ठेवावं लागत, तर ते काम देखील डिशवॉशरच करतो.
काहीवेळा आपल्याला नवीन रेसिपी करून बघावीशी वाटत असते परंतु भांडी घासायची कटकट वाढेल म्हणून आपण ते टाळत असतो, पण या डिशवॉशरमुळे आपण कोणत्याही प्रकारच्या कितीही रेसिपी बिनधास्तपणे करून बघू शकतो.
डिशवॉशर बाहेरून दिसायला वॉशिंग मशीन सारखाच असतो, परंतु वॉशिंग मशीन सारखा यामध्ये फक्त एकच ड्रम नसतो, वेगवेगळ्या भांड्यांसाठी वेगवेगळे स्टॅन्ड असतात.अगदी छोट्या चमच्यांपासून ते पाण्याचे ग्लास, चहाचे कप , कढया, तवे मोठी पातेली या सर्वांसाठी वेगळे कप्पे असतात. यामध्ये खूप भांडी एकवेळेला धुता येतात.
बऱ्याचशा डिशवॉशर मध्ये A++ एनर्जी एफिशिअन्सी फिचर असते त्यामुळे विजेची बचत होते. एकावेळेस ६ ते ८ लोकांची भांडी धुण्याची क्षमता या डिशवॉशर मध्ये असते. काही डिशवॉशर मध्ये तर १२ ते १५ लोकांची भांडी धुण्याची सोया असते. आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार आपण आपल्याला हवा तो डिशवॉशर निवडू शकतो.
तर असा हा बहुगुणी डिशवॉशर आपल्या सर्वांच्याच घरी असायला हवा. इथे क्लिक करून तुम्ही आजच ऑर्डर करू शकता हा डिशवॉशर.