पीठ मळणे हा बरेचशे पदार्थ बनविण्यामधला एक महत्वाचा आणि कंटाळवाणा भाग आहे. आपल्या भारतीय परंपरेत तर स्वयंपाक शिकण्याची सुरुवातच पीठ मळायला शिकण्यापासून होते. आपल्या रोजच्या जेवणात चपाती, भाकरी, रोटी, नान, पराठा वगैरे असतातच त्यासाठी पीठ मळणे हे काम दर दिवसाला जवळपास सर्वांच्या घरी होतच असते. वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ मळावे लागते उदा. घट्ट, मऊ , मध्यम इत्यादी. तर असे हे पीठ मळणे आता एकदम सोपे झाले आहे पीठ मळायच्या यंत्रामुळे.
स्त्री मग ती कोणीही असो फक्त गृहिणी असो की नोकरी व्यवसाय करणारी असो पीठ मळण्याच्या यंत्राने तिचे खूपच काम सोपे झाले आहे. या यंत्रामध्ये आपण अगदी चपाती, भाकरी पासून ते पिझ्झा, बर्गर पर्यंत कसलेही पीठ अगदी काही सेकंदामध्ये मळू शकतो.
सणासुदीच्या दिवसात तर आपल्याला विविध पदार्थांसाठी विविध पीठे माळवी लागतात जस कि चकल्या, करंज्या, शंकरपाळे इत्यादी त्यावेळेस देखील या यंत्राचा खूप उपयोग होतो.
हे यंत्र वापरायला आणि स्वच्छ करायलादेखील सोपे आहे. यामध्ये स्टेनलेस स्टीलचे एक गोलाकार भांडे असते त्यात पीठ मळले जाते. पीठ मळून झाल्यावर भांडे पटकन धुवून टाकता येते व त्वरित स्वच्छ होते.
इथे क्लिक करून पीठ मळण्याचे यंत्र तुम्ही लगेचच मागवू शकता.



