सिलिकॉन कणिक मळण्याची पिशवी

मैत्रिणींनो आपल्याला स्वयंपाक करणे कितीही आवडत असो कणिक मळण्याचा कंटाळा बहुतेक सगळ्यांनाच असतो. यासाठी नाही कि आवडत नाही पण यासाठी कि हात खराब होतात आणि मग ते पीठ मळून पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही म्हणजे एखादा फोन घेणे किंवा कढईत शिजायला टाकलेली भाजी हलविणे वगैरे, काही मैत्रिणींची मुले लहान असतात त्यामुळे कणिक मळत असताना मूल रडायला लागलं तर फारच पंचाईत होते . पीठ मळताना पीठ नखात जाऊन नखे खराब होतात तसेच ते इकडे तिकडे उडून किचन प्लॅटफॉर्म खराब होतो आणि त्यामुळे तो धुण्याचे काम देखील वाढते. पण आता आपली ही  चिंता मिटली. कारण आता आपण सिलिकॉन पीठ मळण्याची पिशवी वापरून केव्हाही पीठ मळू शकतो तेही हात आणि आजूबाजूची जागा खराब न करता.

ही सिलिकॉनची पिशवी वापरून आपण वेगवेळ्या पदार्थांसाठीचे पीठ मळू शकतो, जसे की चपातीचे, पोळीचे, पराठ्याचे, पिझ्झ्याचे वगैरे. बस पिशवीमध्ये पीठ, पाणी, तेल इत्यादी पीठ मळण्यासाठी आवश्यक पदार्थ घाला, पिशवी बांधा आणि पीठ मळायला सुरु करा. इतकेच नाही तर आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी ही पिशवी वापरू शकतो  जसे की उकडलेले बटाटे कुस्करायला जे आपल्याला विविध पदार्थ बनविण्यासाठी लागतात उदा. पावभाजी, पराठे वगैरे. तसेच या पिशवीमध्ये आपण  अन्न रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवू शकतो  किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकतो , भाज्या आणि फळे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी आपण ही सिलिकॉनची पिशवी वापरू शकतो. मांस किंवा मासे मॅरीनेट करण्यासाठी, साहित्य पिशवीमध्ये घाला, पिशवी बांधा आणि फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटो इत्यादींची प्युरी बनविण्यासाठीसुध्दा आपण याचा वापर करू शकतो. प्रवासात आपण अन्न पदार्थ ठेवण्याची पिशवी म्हणून सुद्धा वापरू शकतो.

या सिलिकॉन पिशवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नॉन-स्टिक असल्याने पीठ आतमध्ये कुठेही चिटकून राहत नाही. तसेच हि पिशवी उच्च लवचिकता प्रदान करते. लवचिक आणि दुमडता येण्याजोगी असल्यामुळे काम झाल्यावर घडी करून ठेवता येते आणि त्यासाठी जास्त जागाही लागत नाही.

ही सिलिकॉनची पिशवी मायक्रोव्हेव आणि डिशवॉशर सेफ आहे. ही सिलिकॉनचे पिशवी असल्यामुळे आपल्याला तिचा पुनःपुन्हा वापर करता येतो.वापरा धुवा आणि पुन्हा वापरा. हि फूड ग्रेड सिलिकॉनपासून बनलेली आहे आणि बीपीए फ्री आहे .  

चला तर मग आताच खरेदी करा सिलिकॉन कणिक मळण्याची पिशवी. स्वतः वापर आणि आपल्या मैत्रिणींना भेट करा.