इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश

आपल्या आयुष्यात स्वच्छतेचं काय महत्व आहे हे कोविड-१९  मध्ये आपल्याला पूर्णपणे पटलेलं आहे. मग ते घर असू दे, ऑफिस असू दे किंवा कोणतीही वस्तू असू दे, त्याची स्वच्छता ठेवणे अगदीच गरजेचे आहे. या आधी सुध्दा आपण स्वच्छतेची विविध यंत्रे पहिली जसे की साफसफाई करणारा रोबो, जाळी साफ करणारा ब्रश, गाडी आतमधून स्वच्छ करणारा फोम इत्यादी त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश. आता बाजारात अनेक प्रकारचे, आकाराचे आणि वेगवेगळ्या साहित्यापासून बनविलेले ब्रश मिळतात, मग असं काय विशेष आहे या ब्रश मध्ये ? तर हा ब्रश इलेक्ट्रिक आहे म्हणजे आपले कष्ट थोडे कमी करणारा आहे. आता पूर्वीसारखी कष्टाची कामे करण्याची कोणाला सवय आणि गरज राहिलेली नाही परंतु जेव्हा गोष्ट स्वच्छतेची असते आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपली शक्ती वापरावी लागते जे की आजच्या काळात फारच त्रासदायक वाटते. मग यावर उपाय म्हणून हा इलेक्ट्रिक ब्रश आलेला आहे. हा ब्रश आपले काम आणि वेळ वाचवतो आणि स्वच्छतापण चांगल्या पद्धतीने करतो.

हा आपण भांडी घासायला, किचन कट्टा स्वच्छ करायला, फारशी एकदम स्वच्छ करायला वापरू शकतो. तसेच याने आपण गाडी स्वच्छ करणे, पॉलिश करणे इत्यादी कामेदेखील करू शकतो.  

या पॉवर स्क्रबरमध्ये मेटल गीअर्स आहेत. जेव्हा तुम्ही घाण आणि कठीण डाग साफ करण्यासाठी इलेक्ट्रिक स्क्रबरवर दबाव टाकता तेव्हा ते अचानक काम करणे थांबवत नाही, त्यामुळे व्यवस्थित साफ करणे खूप सोपे आणि प्रभावी होते. या कॉर्डलेस स्क्रबरमध्ये 3 अदलाबदल करण्यायोग्य ब्रशेस आहेत जे तुम्हाला विविध प्रकारचे पृष्ठभाग सहजतेने स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. या ब्रशेस मध्ये स्वच्छता करण्याची प्रचंड ताकद आहे. त्यामुळेच तेलकट झालेली गॅसची शेगडी असो किंवा फरशीवर पडलेले चिवट डाग असोत हा ब्रश एकदम आराम स्वच्छ करू शकतो. बाथरूम स्वच्छ करण्यामध्ये सुध्दा आपली बरीच शक्ती खर्च होत असते तिथे देखील हा ब्रश वापरून आपण आपले कष्ट वाचवू शकतो. याशिवाय आपण शॉवर वॉल, सिंक, गाडीची अतिशय घाण झालेली चाके किंवा बाथटब देखील एकदम स्वच्छ चकचकीत करू शकतो.

६० ते १०० मिनिटे सलग चालविण्यासाठी आपल्याला याचे फक्त दोन तास चार्जिंग करावे लागते.   अत्यंत सीलबंद, वॉटरप्रूफ  डिझाइनमुळे ते ओल्या ठिकाणी, जसे कि बाथरूम , सुध्दा नीट वापरता येते.

खरंच हा ब्रश प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे कारण एखाद्या ठिकाणी घाण दिसतीये तर ती पटकन काढून टाकता येईल नाहीतर आपल्याला काम करण्याचा उत्साह येईपर्यंत किंवा कामवाल्या मावशी येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. तुम्ही  इथे क्लिक करून आत्ताच हा ब्रश मागवू शकता.