सेव्हन इन वन इलेक्ट्रिक प्रेशर कुकर | 7-in-1 Electric Pressure Cooker

प्रेशर कुकर आणि इलेक्ट्रिक !!! व्वा. कसली मस्त संकल्पना आहे ना ? होय संकल्पना पण मस्त आहे आणि तो वापरून जेवण बनविणे देखील मस्त आहे. गॅसच्या वाढणाऱ्या किमती आणि त्याची असणारी कमतरता पाहता हा इलेकट्रीक कुकर खरंच एक उपयोगी यंत्र आहे. हा स्वयंपाक घरातील ७ वेगवेगळ्या उपकरणांचे एकत्रीकरण आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी वेगवेगळी साधने वापरण्याची गरज नाही. याला न्यूट्री-पॉट असेदेखील म्हणतात. या न्यूट्री-पॉटमध्ये भारतीय आणि विदेशी खाद्यपदार्थ आपण अगदी सहजगत्या बनवू शकतो. आपल्याआवडीचे खाद्य पदार्थ एका बटणाच्या क्लिक वर आपण बनवू शकतो. याच्या स्वयंचलित ऑपरेशन्समुळे  नवशिक्यासाठी स्वयंपाक करणे खूप सोपे आणि सोयीस्कर बनते. यामध्ये स्टीमर, स्लो कुकर, फोडणी इत्यादी १८ प्रकारचे प्री-सेट फंक्शन्स आहेत त्यामुळे स्वयंपाक करणे आता सोपे झाले आहे.

Electric Pressure Cooker

न्यूट्री-पॉट बुद्धिमान मायक्रो कॉम्प्युटरने सुसज्ज आहे जे तुम्ही निवडलेल्या डिशच्या गरजेनुसार प्रोग्राम केलेले आहे. हे तापमान आणि दाब इष्टतम पातळीवर ठेवते आणि आपल्याला परिपूर्ण डिश बनविण्यात मदत करण्यासाठी गरम करण्याची तीव्रता समायोजित करत राहते. न्यूट्री-पॉट तुमचा रोजचा स्वयंपाक अत्यंत सोयीस्कर बनवते. न्यूट्री-पॉटसह कोणीही शिजवू शकतो आणि प्रत्येक वेळी परिपूर्ण परिणाम मिळवू शकतो. तुम्ही प्रो किंवा कुकिंगच्या जगात नवशिक्या असाल, एक टच कुकिंगसह न्यूट्री-पॉट तुमचा किचन पार्टनर आहे.

या न्यूट्रिपॉटमध्ये स्वयंपाकाचे साहित्य टाका, स्वयंपाकाचे फंक्शन निवडा आणि किचन मधून निघून जा , बाकीचं सगळं हा न्यूट्रिपॉट बघेल. तुम्ही परत आल्यानंतर तुमच्या आवडीचा पदार्थ एकदम गरमागरम तयार असेल. याची बांधणी उत्कृष्ट आहे , आणि याच्या कंट्रोल्ड प्रेशरमुळे हा वापरण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. याची सिलिकॉन रिंग विलग करता येते तसेच सेफ्टी व्हॉल्व्हसह, झाकण आणि आतील भांडेदेखील स्वच्छ करणे सोपे आहे. या  न्यूट्री-पॉटमध्ये एक डीले टाइमर नावाची जादू आहे. आपण आपल्या सोयीनुसार स्वयंपाक सुरू करण्यासाठी आपले न्यूट्री-पॉट प्रोग्राम करू शकतो जेणेकरुन अन्न वेळेवर तयार होईल आणि गरमही राहील, सर्व्ह करण्यापूर्वी अन्न पुन्हा गरम करण्याचा आपला त्रास वाचेल. आपण तो टायमर 30 मिनिट ते 24 तासांच्या दरम्यान कुठेही  सेट करू शकतो. न्युट्री-पॉट लिडची अनोखी लॉकिंग सिस्टीम अन्नाच्या आतील सर्व पोषण लॉक करते त्यामुळे प्रत्येक वेळी आरोग्यदायी अन्नाची खात्री मिळते.

यामध्ये आपण अगदी सध्या भातापासून , पुलाव पर्यंत किंवा नुसता खिचडी भात किंवा बिर्याणी पर्यंत, मटण करीपासूनकेक पर्यंत वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो.

असा हा बहुगुणी इलेक्ट्रिक प्रेशर कुकर प्रत्येक मॉडर्न घरामध्ये असायलाच हवा आणि तो इथे क्लिक करून तुम्ही आत्ताच ऑर्डर करू शकता.