फिंगर चिप्स बनविण्याचे यंत्र

सर्व वयोगटातील लोकांना  फिंगर चिप्स आवडतात. फिंगर चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाट्याचे लांब लांब कापून तळलेले तुकडे जे आपल्याला घरी सहजपणे बनवता येतात.हे खायला अतिशय रुचकरअसले तरी ते बनविण्यासाठी बटाटा एकसारख्या लांब लांब आकारात कापणे हे एक फारच कंटाळवाणे काम असते शिवाय ते काप एकसारखे झाले नाहीत तर फिंगर चिप्स छान वाटत नाहीत. परंतु हे फिंगरचिप्स बनविण्याचे यंत्र आपण वापरले तर काही मिनिटातच आपण बटाट्याचे एकसारखे लांब काप करू शकतो. 

हे वापरण्याची पद्धत पण खूप सोपी आहे,बस हॉपरमध्ये बटाटा ठेवा आणि हँडल दाबा की झाल्या आपल्या फ्रेंच फ्राईज किंवा फिंगरचीप्स चिरुन तयार.

याचा वापर आपण गाजर, काकडी इ. भाज्यांचे काप करण्यासाठी देखील करू शकतो, जे आपण सलाड मध्ये वापरतो.

हे यंत्र वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास अतिशय सोपे आहे. याचे सर्व भाग सुटे होऊ शकतात. परंतु आपण हे डिशवॉशर मध्ये स्वच्छ करू शकत नाही.  

याचे कटिंग ब्लेड्स खूप शार्प आहेत त्यामुळे बटाटे आणि इतर भाज्या आपण सहजपणे कापू शकतो.यासोबत  दोन कटिंग ग्रीडस (जाळ्या) व दोन पुशर प्लेट येतात.चला तर मग रेस्टोरंट सारखे फ्राईज आता घरीच बनवा.