३६० अंशात फिरणारी नळाची तोटी

स्वयंपाकघरात आपल्याला सतत पाण्याची आवशकता असते. भाज्या व फळे  धुणे, भांडी घासणे, कट्टा स्वच्छ करणे इत्यादी गोष्टींसाठी आपण सतत पाण्याचा वापर करत असतो.  यातील सर्व गोष्टींना आपण पाण्याचा एकसारखाच वेग वापरतो जो की आपल्या पाण्याच्या नळातून येतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते व कधी कधी आपले समाधान देखील होत नाही.  काही वस्तू धुण्यासाठी आपल्याला पाण्याच्या जास्त दाबाची गरज असते, बहुतेकवेळा कट्ट्यावर लावलेला नळ एकाच जागी स्थिर असतो, परंतु काही कामे अशी असतात कि नळ फिरता असेल तर पाण्याचा जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो.

फिरणाऱ्या तोटीचे खूप उपयोग असतात. आपल्या सिंकचा कोणताही कोपरा आपल्याला अगदी सहज स्वच्छ करता येतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण तो वाकवू शकतो.

यामध्ये तीन प्रकारचे स्प्रे असतात  जेट, शॉवर आणि जेट + शॉवर मोड जे आपण आपल्या  गरजेनुसार निवडू शकतो. हा पाण्याचा  नळ उच्च दर्जाचे ABS प्लास्टिक, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉनचा  बनलेला आहे, आणि महत्वाचे म्हणजे दीर्घकालीन वापरासाठी टिकाऊ आहे.

याच्या वापराने पाण्याची जवळपास ५०% पर्यंत बचत होते.  आपल्या हि तोटी नळाला लावता येते त्यामुळे आधीच असलेला नळ बदलण्याची आवश्यकता नाही. तोटी नळाला लावायलासुध्दा सोपी आहे व कोणत्याही साधनांशिवाय आपण हि तोटी नळाला सहजपणे लावू शकतो.

तोटीचा प्लॅस्टिक तळ स्वच्छ करण्यासाठी वेगळा करता येण्याजोगा आहे. यावर लवकर गंज चढत नाही.

इथे क्लिक करून तुम्ही हि अतिशय उपयुक्त्त तोटी आत्ता खरेदी करू शकता.