मोबाईल फोन स्टॅन्ड

मैत्रिणींनो मोबाईल नावाच्या छोट्या यंत्रामध्ये केवढे मोठे विश्व् सामावलंय ना ! हल्ली आपण आपल्या स्मार्टफोन शिवाय राहण्याची कल्पना तरी करू शकतो का ? आपल्याला सतत मेसेजेस बघायला , फेसबुक बघायला , बातम्या बघायला आणि सर्वात महत्वाचे पाककृती (रेसिपीज) बघायला या स्मार्टफोन चा केवढा तरी उपयोग होतो. पण एक समस्या आहे हा मोबाईल वापरायचा तर एक हात सतत व्यस्त राहणार, पण आपल्या बहुतांश मैत्रिणींना ते शक्य नसत मग अशा वेळेस आपल्याला वाटत कि मोबाईल बघायला देवानं एक अजून हात द्यायला पाहिजे होता…..खरं ना ? डोण्ट वरी Xtore आपल्यासाठी घेऊन आला आहे युनिव्हर्सल मोबाईल आणि टॅब होल्डर.

हा मोबाईल होल्डर सिलिकॉन चा असल्यामुळे फ्लेक्सिबल आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा टॅब हवा तसा फिरवू शकतो व पाहिजे त्या अंतरावर ठेवू शकतो. आपण कोणतेही काम करत असताना मोबाईल पाहू शकतो. झोपताना संगीत ऐकू शकतो. काही वेळेस झोपताना बरेचशे मेसेजेस वाचायचे असतात पण मोबाईल हातात धरायचा कंटाळा आलेला असतो अशा वेळेस हा मोबाईल होल्डर फारच उपयोगी पडतो. तसेच आपण मोबाईल वर बघून एखादी पाककृती करणार असतो तेव्हा मोबाईल कशाला तरी टेकवून ठेवावा लागतो आणि तरी तो तसा जास्त वेळ टिकेल कि नाही खात्री नसते तेव्हा देखील हा मोबाईल होल्डर मदतीला येतो.हल्ली बऱ्याच लोकांना स्वतःच्या कलेचे व्हिडीओज बनविण्याची आवड असते जस कि चित्रकला, पाककला वगैरे परंतु आपण आपली कला दाखवत असताना मोबाईल कोण धरणार हा प्रश्न असतो तो आता या मोबाईल होल्डर मुळे मिटला आहे.आपण मोबाईल हातात धरून पाहतो तेव्हा डोळे आणि स्क्रीन मधील अंतर कमी असते ज्याचा आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो विशेषतः लहान मुलांच्या पण हा फ्लेक्सिबल होल्डर वापरून आपण डोळे आणि मोबाईलच्या स्क्रीन मध्ये सुरक्षित अंतर ठेऊ शकतो.मोबाईलमुळे वृध्द् लोकांचे जीवन सुध्दा बरेच सुखकर झाले आहे, परंतु बराच वेळ मोबाईल हातात धरणे त्यांना शक्य होत नाही अशा वेळेस हा फ्लेक्सिबल मोबाईल होल्डर त्यांच्या फारच कामी येऊ शकतो.

सर्वांच्या घरात असायलाच पाहिजे असा हा छान सुटसुटीत फ्लेक्सिबल मोबाईल होल्डर तुम्ही इथे क्लिक करून आजच मागवू शकता.