फ्रिजचा दुर्गंध घालवणारे यंत्र

ओह !!! असं खरंच काही असत का ? काय खार वाटलं नाही ना? पण आता खरंच असं यंत्र आलंय आणि तेही एकदम मस्त. चला तर मग झटपट याची माहिती घेऊ. ‘कुल ममा’ हे एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या फ्रिजचे विविध वास शोषून घेणारे यंत्र आहे.

हल्ली आपल्याला खूप सवय झालीये, काहीही आणलं तरी फ्रिज मध्ये ठेवायचं, खरतर फ्रिज मध्ये विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ ठेवायचे नसतात पण आपल्याला वेळ कुठे असतो? मग गडबडीत आपण सगळं एकत्र ठेवतो. त्यामुळे होत काय, की सगळ्या पदार्थांचे वास एकमेकांना लागतात आणि काहीच चांगलं लागत नाही. तर या प्रॉब्लेमवर उपाय म्हणजे कुल ममा.

वापरायला अतिशय सोपं असं  हे यंत्र काम कस करतं  ते पाहू. फक्त डोके आणि केसांचा भाग वर करा, 150 ग्रॅम बेकिंग सोडा घाला आणि बंद करा की झालं आपलं काम. बघा म्हणजे एक मिनिटाचं काम आणि कोणतेही अपायकारक केमिकल्स न वापरता. दुर्गंधी आत  शोषली जाते, ताजी हवा बाहेर वाहते आणि वासापासून आपल्याला मुक्ती मिळते.

बेकिंग सोडा तुमच्या फ्रिजमधील वास कमी करण्यासाठी 1 महिन्यापर्यंत मदत करेल. त्याच्यामध्ये एक इन-बिल्ट कॅलेण्डर सुध्दा असतं ज्यायोगे आपण जेव्हा त्यात सोडा भरला आहे त्याची तारीख सेट करता येते म्हणजे एक महिन्यानंतर तो बदलायची आठवण राहते. त्याच्या तळाशी एक गडद निळ्या रंगाची चकती असते ती चालू महिन्याला सेट करा म्हणजे कुल ममाच्या वर जे निळं बटन असतं तिथे महिन्याचे नाव दिसेल.

त्या कुल ममाला फ्रिजच्या एकदम आतमध्ये ठेवा. ती अन्नातून बाहेर पडणाऱ्या ओलसर रेणूंमुळे येणारा वास शोषून घेते व आपला फ्रिज २४ तासात फ्रेश वाटू लागतो.

हे यंत्र डिशवॉशर सेफ आहे. डिशवॉशरच्या वरच्या कप्प्यात हे ठेवावे. हे घर आणि ऑफिस मधल्या फ्रिज किंवा फ्रिजर साठी अतिशय उपयुक्त आहे. शिवाय भेट म्हणून देण्यासाठी देखील योग्य आहे.

या यंत्राचं डिझाईन सुध्दा एकदम मनमोहक आहे त्यामुळे प्रत्येकवेळी फ्रिज उघडल्यावर आपलं मन पण फ्रेश होईल आणि फ्रीजही.

चला तर मग इथे क्लिक करा आणि या कुल ममाला घरी बोलवा तुमचा फ्रिज दुर्गंधी विरहित ठेवण्यासाठी.