जीपीएस ट्रॅकर | GPS Tracker

जीपीएस ट्रॅकर !!! हा शब्द आता आपल्यासाठी नवीन राहिला नाही. हल्ली सर्वांकडे स्मार्ट फोन असतो आणि त्यात जीपीएस असतोच आणि आपण तो कधी ना कधी वापरलेला असतो. परंतु आता आले आहे एक नवीन यंत्र जे आपण आपल्या गाडीत ठेवू शकतो आणि आपली गाडी कधीही ट्रॅक करू शकतो. खरतर हे डिव्हाईस खूपच उपयोगी आहे. हल्ली सगळीकडे असुरक्षितता निर्माण झाली आहे, आणि त्या दृष्टीने पाहता हे यंत्र सर्वांकडे असायलाच हवे.

अत्यंत संवेदनशील GPS चिप आणि क्लाउड सर्व्हर वापरून तुमच्या स्मार्ट फोनवर आपल्या वाहनाची रिअल टाइम हालचाल पाहू शकतो. यामध्ये एक इन्स्टंट अँटी थेफ्ट अलार्म असतो जो आपण आपल्याला हवा तेव्हा ऑन करू शकतो, आणि जर का आपले वाहन चोरण्याचा प्रयत्न झाला तर  तो लागेचच सुरु होतो आणि वाहनांची चोरी टाळता येते. यामध्ये आपण सर्व ट्रॅकिंग आपल्या स्मार्ट फोनवर करू शकतो. याचे एक सर्वांत  महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण इमर्जन्सीअधे मोबाईलच्या साहाय्याने वाहन बंद करू शकतो.  म्हणजे समजा जर का वाहन चोरीला गेले तर आपण मोबाईलच्या साहाय्याने ट्रॅक तर करूच शकतो आणि वाहन बंद देखील करू शकतो.

यामध्ये ९० दिवसांचा डेटा साठवून ठेवता येतो म्हणजे आपण आधीचा डेटादेखील पाहू शकतो. लाइव्ह इग्निशन ऑन/ऑफ अलर्ट, ओव्हर-स्पीडिंग अॅलर्ट, एंट्री आणि एक्झिट पॉईंट्सवर अॅलर्ट, रिअल टाइममध्ये निष्क्रियतेचे मॉनिटर आणि बरेच फीचर्स यामध्ये आहेत जे खूपच उपयोगी आहेत. आपण यामध्ये भौगोलिक कुंपण सेट करु शकतो.  नकाशावर सुरक्षित क्षेत्रे ठरवू शकतो  आणि जेव्हा वाहन त्या झोनमध्ये प्रवेश करते/बाहेर जाते तेव्हा सूचना मिळवू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण हे डिव्हाईस आपल्या  मुलांच्या सुरक्षेततेसाठी  त्यांच्या बॅगेत ठेवू शकतो आणि त्यांच ट्रॅकिंग करू शकतो.

असे हे नवीन डिव्हाईस जे की आत्ता पर्यंत हजारो लोकांनी वापरलय आणि वापरत आहेत ते आपल्याकडे पण असलेच पाहिजे, कारण आत गाडी असणे ही श्रीमंती राहिली नसून गरजेची गोष्ट झाली आहे आणि त्याची सुरक्षा करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या सुरक्षिततेसाठी देखील आपण हे घेतले पाहिजे.

चला तर मग इथे क्लिक करा आणि आत्ताच मागवा हे जीपीएस ट्रॅकर यंत्र