ग्रील सँडविच टोस्टर

Sandwich maker

सँडविच हा प्रकार तसा परदेशी, ब्रिटिशांमुळे आपल्याकडे माहित झालेला परंतु ज्याप्रमाणे आपण अनेक परदेशी पदार्थ कमी वेळेत आपलेसे केले त्यापैकी सँडविचचा नंबर फार वरचा आहे. करायला आणि खायला एकदम सुटसुटीत आहे.सँडविचमध्ये असंख्य प्रकार आहेत आणि ज्याप्रमाणे आपण भारतीय लोक कोणत्याही देशाचा पदार्थ असो त्यात देशी तडका लावतोच त्याप्रमाणेच या सॅन्डविचला सुध्दा आपण पौष्टिक केलेले आहे.

असं म्हणतात कि ब्रेड(पाव) खाऊ नये पचायला जड असतो, परंतु हाच पाव जर भाजून खाल्ला तर पचायला खूप हलका होतो आणि त्यात जर भाज्या म्हणजे काकडी, टोमॅटो , कांदा , गाजर इत्यादी घातले तर पौष्टिक देखील होतो. आणि ग्रिल्ड सँडविचमध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी मिळत असल्यामुळे ते खूपच लोकप्रिय आहेत.

तर असे हे पौष्टिक ग्रिल्ड सँडविचेस खाण्यासाठी आपल्याला शक्यतो कोणत्यातरी कॅफे किंवा रेस्टोरंट मध्ये जावे लागते.परंतु या नवीन ग्रील टोस्टरमुळे आपल्याला आता घरच्या घरी कमी वेळेत स्वादिष्ट आणि पौष्टिक ग्रिल्ड सँडविचेस बनविणे एकदम सोपे झाले आहे. तुम्ही व्हेज असा किंवा नॉन-व्हेज या टोस्टरने कोणत्याही प्रकारचे ग्रिल्ड सँडविच अगदी झटपट रेस्टोरंट सारखे बनवू शकता. करायला कमी वेळ लागत असल्याने अगदी मुलाने भूक लागली म्हणलं कि आपल्या ताज्या भाज्या वापरून आपण अक्षरशः पाच ते सात मिनिटात त्याला हे पौष्टिक ग्रिल्ड सँडविच बनवून देऊ शकतो.

यामध्ये आपण सध्या ग्रिल्ड सँडविच पासून ते अगदी तोंडाला पाणी सुटणाऱ्या जाड रूबेन सँडविच पर्यंत सर्व प्रकार बनवू शकतो.

याचे ग्रिल प्लेट वरचे ॲडव्हान्स नॉन स्टिक कोटिंग नवीन टोस्टर मध्ये दुप्पट टिकाऊ आहे.हे स्वयंपाक करताना अतिरिक्त तेल आणि बटरची गरज आपोआप काढून टाकते ज्यामुळे स्वयंपाक आरोग्यदायी होतो.यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक काही नाही त्यामुळे आपण पौष्टिक अन्न अगदी काही मिनिटात बनवू शकतो.

एर्गोनोमिक हँडलमुळे तुम्ही अतिशय सफाईदारपणे ते वापरू शकता व तुमचे हात भाजण्याची शक्यताही राहत नाही कारण हे हॅन्डल्स उष्णता प्रतिरोधक मटेरियल पासून बनले आहेत. इंडिकेटर लाइट्स तुम्हाला तुमचा टोस्टर कधी प्लग इन केला आणि प्रीहीट केव्हा झाला आणि स्वादिष्ट भोजन तयार करण्यासाठी केव्हा तयार आहे हे दाखवतात.

लाल इंडिकेटर दिवा पॉवर किंवा हीटरसाठी आहे आणि हिरवा इंडिकेटर दिवा ग्रिल तयार झाले आहे किंवा कट ऑफ दर्शविण्यासाठी आहे. यामध्ये थर्मोस्टॅटीक कंट्रोलिंग फिचर आसल्यामुळे ह्याला वापरताना अतिशय कमी वीज वापरली जाते, साधारणतः ८५० वॉट्स. त्यामुळे ह्याच्या वापराने वीजबिल वाढेल हि भीती सुदधा राहत नाही.

तर प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा आसा हा ग्रील सँडविच टोस्टर घेण्यासाठी तुम्ही आत्ता इथे क्लिक करू शकता.