हँड ज्युसर

ज्यूस किंवा मराठीत आपण ज्याला फळांचा रस असे म्हणतो तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पौष्टिक व स्वादिष्ट असतो. डॉक्टर्ससुद्धा आपल्याला आहारामध्ये फळांचा रस समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. एखाद्या आजारानंतर ताकद लगेच भरून येण्यासाठी ज्यूस पिण्यासारखा सोपा उपाय नाही. लहानमुलांना खेळून झाल्यावर लगेच ऊर्जा मिळण्यासाठी ज्यूस देतात, किंवा मोठे मोठे खेळाडू देखील खेळल्यानंतर ज्यूस पिणेच पसंत करतात. परंतु ज्यूस हा नेहमी ताजा पिणे गरजेचे आहे.

ताजा ताजा ज्यूस बनविणे वेळखाऊ काम असते विशेषतः फळांमधल्या बिया काढण्याचे काम.मिक्सर मध्ये ज्यूस काढायचा तर विचारायलाच नको. आधी बिया काढा, मग ज्यूस झाल्यावर तो गाळून घ्या इत्यादी किचकट गोष्टी कराव्या लागतात व आपला वेळही जातो.

पण या हँड ज्युसरमुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ना बिया काढण्याची झंझट ना गाळायची खटपट बस फळांच्या फोडी करा ज्युसरमध्ये घाला आणि हॅन्डल दाबा की झाला ज्यूस तयार.

हा ज्युसर उच्च प्रतीच्या ऍल्युमिनिअम आणि इतर मिश्र धातूंपासून बनला आहे.याचे पी पी लेअर्स फूड ग्रेडेड असल्यामुळे हा वापरण्यासाठी सुरक्षित आहे.याच्या त्रिकोणी नोझलमुळे ज्यूस ओतत असताना तो सांडत नाही व आपण स्थिरपणे ओतू शकतो. हेवी ड्युटी अलॉय बॉडीमुळे तुमचे हात कधीही घसरणार नाहीत, तळाच्या डिझाइनमुळे ज्युसर सहज आणि स्थिरपणे टेबलवर ठेवता येतो.

हे गंज प्रतिरोधक आहे आणि फळांवर कसलीही रिअक्शन होत नाही किंवा जीवाणू देखील वाढत नाहीत त्यामुळे एकदम सुरक्षित आहे

हा ज्युसर स्वच्छ करायला एकदम सोपा आहे याचे भाग सुटे होतात त्यामुळे वापरून झाल्यावर प्रत्येकवेळी ते वेगळे करून पाण्याने स्वच्छ धुता येतात. पाण्याने धुतल्यावर कोरडे करणे गरजेचे आहे.फक्त हा डिशवॉशर मध्ये धुता येत नाही.

हा ज्युसर सहज हातातून नेता येण्याजोगा असल्यामुळे आपण कुठेही नेऊ शकतो व ताजा ज्यूस पिण्याचा आनंद घेऊ शकतो व लगेच स्वच्छ सुध्दा करू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता हा ज्युसर खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version