
करंजी ! आहाहा ! नुसतं नाव घेतलं तरी जिभेवर चव रेंगाळते आणि डोळ्यासमोर मस्त तळलेली खुसखुशीत करंजी येते. भारतीय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांची दिवाळी करंजी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हा पदार्थ जितका सुंदर,चविष्ट आणि विशिष्ट आहे तितकाच तो बनवायला देखील अवघड आहे. करंजी रेसिपी ही एक कौशल्यपूर्ण गोष्ट आहे. ह्या करंजीचे पीठ मळण्यापासून ते शेवटचा आकार देईपर्यंत सगळे टप्पे अगदी निगुतीने करावे लागतात. आणि शेवटचा आकार द्यायचा टप्पा तर विशेष अवघड आहे. परंतु या नोलोफी स्टेनलेस स्टील डंपलिंग मेकरमुळे हा शेवटचा टप्पा झालाय सोप्पा.
पूर्वीच्या भारतीय स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जायचा आणि तेच त्यांचं महत्वाचं काम होत असं म्हणल्यास वावगं होणार नाही. परंतु परिस्तिथी बदलली, आधुनिक स्त्रीला घराच्या बाहेर पडून काम करण्याची गरज निर्माण झाली. आपल्या भारतीय स्त्रियांची एक खासियत आहे कि त्या जरी बाहेर जाऊन काम काम करत असतील, मोठी मोठी पदे भूषवित असतील तरी त्या प्राणपणाने आपल्या परंपरा जपतात. माझ्या मते आधुनिक भारतीय स्त्री जगातली सर्वच गोष्टीत एक नंबर आहे मग ती नोकरी करण्यासाठी असू दे, एखादा व्यवसाय करण्यासाठी असू दे, मुलांचे संगोपन करण्यासाठी असू दे, कुटुंब संभाळण्या साठी असू दे किंवा मग परंपरा जपण्यासाठी असू दे ती अतिशय समर्पकरित्या या जबाबदाऱ्या पार पडत असते. हे सर्व करत असताना तिला जर का छोट्या छोट्या उपकरणांची साथ मिळाली तर तीच आयुष्य सुखकर होऊन जाईल. तर हे डंपलिंग मेकर असेच एक साधन आहे, ज्याने करंज्या बनविणे खूपच सोपे झाले आहे. यामध्ये आपण करंजी, कडबू, मोमोज इत्यादी करंजीच्या आकाराचे पदार्थ बनवू शकतो. करंजीमध्ये सारण भरून ती व्यवस्थित दुमडायची हा जो अवघड टप्पा आहे तो हा डंपलिंग मेकर वापरून एकदम सुटसुटीत होतो.


हा उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टील चा बनलेला आहे. वापरण्यास अतिशय सोपा आहे. हे तुम्हाला कमी कालावधीत सुंदर नागमोडी आकाराची करंजी बनविण्यास अनुमती देईल जेणेकरून तुम्हाला घाई होणार नाही. याचा वापर करून आपण मोमोज सारखे विदेशी पदार्थ देखील बनवू शकतो. तळाशी एक वर्तुळाकार भाग आहे जो पीठ समान रीतीने कापतो आणि तुमच्या हाताला इजादेखील होत नाही. हे खूप सोयीचे आहे आणि अगदी लहानमुले देखील आरामात करू शकतात. त्याची रचना अतिशय उत्तम आहे, ते तुमची करंजी योग्यरित्या बंद करते जेणेकरून तळताना ती उघडली जाणार नाही. हे वापरून आपण कमी वेळेत जास्त करंज्या बनवू शकतो.
हा साचा 304 फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, बॅक्टेरिया या पदार्थाला चिकटत नाहीत; तो बराच काळ वापरला नाही तरी गंजत नाही. प्रत्येक वापरानंतर, स्वच्छ होण्यासाठी ते फक्त पाण्याने स्वच्छ धुतला तरी चालतो लगेच स्वच्छ होतो किंवा तुम्ही तो डिशवॉशरमध्ये टाकू शकता. हा अतिशय खूप टिकाऊ आहे.
वजनाला अतिशय हलका, वापरण्यास सोपा आणि पैसा वसूल असा हा साचा आपल्या प्रत्येकाच्या घरी असलाच पाहिजे. इथे क्लिक करून तुम्ही हा साचा आत्ताच मागवू शकता.
