मसाला पोटली | Hung Curd Bag

मसाला पोटली !!! नाव ऐकून मसाल्याशी संबंधित काहीतरी वाटलं ना ? पण ही उपयुक्त गोष्ट मसाल्याशी संबंधित नाही, तर पोटली सारखी दिसते म्हणून ‘पोटली’ आणि किचन मध्ये वापरतात म्हणून ‘मसाला’ हे नाव दिलय. खरतर ही एक पिशवीच आहे. आणि याचा उपयोग चक्का, पनीर अशा टांगून ठेवाव्या लागणाऱ्या गोष्टींसाठी केला जातो.

टांगून ठेवायचे पदार्थ बनविण्यासाठी मलमलचे सुती कापड लागते. पूर्वी आपल्या घरात मलमलचे कपडे असायचे त्यामुळे आपण सहजपणे जुन्या कपड्यांचा यासाठी वापर करू शकत होतो परंतु आता काळ बदलला आणि सुती कपड्यांवरून आपण फॅशनेबल नायलॉन, जॉर्जेट इत्यादी कपड्यांवर आलो. मग पनीर बनविणार कसे ? मग आपण घरी बनविण्या ऐवजी विकतच आणू लागलो. एकतर विकतचे पनीर खूप महाग पडते आणि त्यात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता वाढते. पण आता या सर्व गोष्टींची काळजी मिटली कारण आपल्यासाठी आली आहे ‘मसाला पोटली’.

ही पोटली१००% मलमलची बनलेली आहे. त्यामध्ये आपण चक्का, पनीर, सोया पनीर,चीज,  बदामाचे दूध, फळांचे ज्यूस,इत्यादी बनवू शकतो. तसेच यामध्ये आपण धान्याला मोड देखील आणू शकतो. तसेचआपण कॉफीदेखील गाळू शकतो.

खरतर घरी पनीर बनविणे किंवा चक्का बनविणे एवढे अवघड काम नाहीये आणि या मसाला पोटलीच वापर करून आपण अगदी सोप्प्या पद्धतीनें या सर्व गोष्टी घरात बनवू शकतो.

चक्का बनविण्यासाठी दही या मसाला पोटलीमध्ये घालून बांधून ठेवावे आणि ३-४ तास किंवा जशी आवशक्यता असेल त्याप्रमाणे टांगून ठेवावे म्हणजे आपल्याला मस्त मलईदार पोत मिळतो.

यामध्ये अतिशय उत्तम प्रतीचे कापड वापरलेले आहे. ही पोटली दिसायला फॅशनेबल आहे तसेच  आरामदायकदेखील आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ही पोटली धुवून पुन्हा पुन्हा वापरता येते. इतर दही टांगायच्या कपड्यांप्रमाणे, हे फॅब्रिक एका वापरानंतर चुरगळत नाही. याची शिलाई मजबूत आहे त्यामुळे उसविण्याची शक्यता कमी असते.

चला तर मग इथे क्लिक करून आत्ताच ऑर्डर करा हि मसाला पोटली.