मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट |Multicolour Smart LED Strip Kit

तुम्हाला जर सांगितलं कि आपण घरात  वेगवेगळ्या १६ दशलक्ष रंगांचे दिवे लावू शकतो तर तुम्ही नक्कीच वेड्यात काढाल , हो ना ? पण हे खरंच शक्य झालय मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट मुळे. विश्वास ठेवणं अवघड वाटतंय ? चला तर मग पाहूया हे नक्की काय आहे ते.

आपले घर सुंदर असावे असं कोणाला नाही वाटत? त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या वस्तू आणतो, घराला सुंदर रंगानी सजवतो, पडदे लावतो, सुंदर रंगांचे दिवे असणारी झुंबरं आणतो आणि बरच काही करतो. आता यामध्ये विशेषतः रात्री साठी आपल्याला सजावट करायची असेल तर वेगवेगळ्या रंगांचे दिवे लावणे आलेच परंतु लावून लावून किती रंगांचे दिवे लावणार ? यासाठी मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट घेऊन आले आहे एक स्मार्ट सोल्युशन. हे दिवे  एल इ डी आहेत आणि ते रंग बदलणारे आहेत. त्यामध्ये आपण १६ दशलक्ष प्रकारच्या रंगांचे  कॉम्बिनेशन करू शकतो आणि आपल्या मूड प्रमाणे आपले घर सजवू शकतो.

या १६ दशलक्ष रांगांमधून आपल्याला हवा तो रंग आपण निवडू शकतो आणि यातला प्रत्येक रंग पाहिजे तेवढा अंधुक देखील करता येतो. यामध्ये आपल्याला हव्या त्या मूड मध्ये लाईट सेट करता येतात जस कि सिनेमा बघण्यासाठी, पार्टी करण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी, वाचनासाठी इत्यादी. यामुळे कोणतीही गोष्ट करण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार करता येते.

 स्मार्ट एलईडी लाइट स्ट्रिप अॅमेझॉन इको डिव्हाइसेस आणि गुगल असिस्टंटशी  सुसंगत आहे. म्हणजे आपण फक्त तोंडी सूचना देऊन त्यातले लाईट्स बंद / सुरु करू शकतो आणि हवे तसे डिम किंवा ब्राईट करू शकतो याशिवाय आपण त्यातले रंग सुध्दा फक्त तोंडी सूचना देऊन बदलू शकतो. साधे संभाषण किंवा स्मार्ट फोन वापरून परिपूर्ण वातावरण सेट करा, लाईट बंद करण्यासाठी तुम्हाला तुमचा  पलंग  सोडण्याची गरज नाही.

याशिवाय यामध्ये आपण ठराविक वेळेला दिवे सुरु बंद व्हावेत अशी सेटिंग करू शकतो. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण ऑफिसमधून घरी येतो त्यावेळेस दिवे सुरु होण्याची सेटिंग केली तर घरी यायला सुध्दा किती छान वाटेल ना! हे स्मार्ट दिवे आहेत त्यामुळे ते मोबाईल अँप वापरून देखील आपण कंट्रोल करू शकतो त्यामुळे घराच्या बाहेर असताना देखील आपण ते सुरु किंवा बंद करू शकतो. म्हणजे आता घरच्या बाहेर असताना घरात दिवे सुरु राहिले का हे टेन्शन येणार नाही.

 हे एल ई डी दिवे असल्याने ते आधीच विजेची बचत करतात आणि त्यातसुध्दा आपण कमी वीज वापरण्याची सेटिंग करू शकतो म्हणजे आपोआप पैशाची देखील बचत होते. हे आपण एकट्याने वापरू शकतो किंवा घरातील सदस्यांसोबत ग्रुपमध्ये देखील वापरू शकतो.  हे स्मार्ट  एल ई डी वापरण्यासाठी कोणत्याही वेगळ्या हब ची गरज नाही आपल्या घरातल्या नेटवर्क ला आपण सहज कनेक्ट करू शकतो.

याशिवाय आपण आपल्या आवडत्या म्युझिकवर सुध्दा ह्यांचे रंग बदलवू शकतो म्हणजे आपल्या म्युझिकवर हे दिवे नाच करतील आणि आपल्या घराला आपण डान्स फ्लोअर बनवू शकतो किंवा शांत म्युझिक लावून शांत रंग निवडून आपण आरामशीर आणि शांत वातावरण तयार करु शकतो. दीर्घ दिवसानंतर आराम करण्याचा किंवा तुमच्या मुलांना झोपण्याची वेळ एक आनंददायक अनुभव देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

इतके सगळे सुंदर फीचर्स असताना वाट कसली बघायची आत्ताच ऑर्डर करूया हे मल्टी कलर स्मार्ट एल इ डी किट. बस इथे क्लिक करा आणि आत्ताच मागवा.