पास्ता आणि नूडल्स बनविणारे यंत्र | Noodles And Pasta Maker 

“आई भूक लागली” असं शाळेतून आल्या आल्या मुलांनी म्हंटल की आई म्हणते “दोन मिनिट हं बाळांनो आत्ता मॅगी बनवते”. ही जाहिरात आपल्यापैकी सर्वानीच पाहिलेली असणार आहे. साधारण ९० च्या दशकात ही अतिशय लोकप्रिय जाहिरात होती आणि या जाहिरातींमुळेच नूडल्स हा प्रकार भारताच्या घराघरात पोहोचला. तस पाहायला पहायला गेलं तर नूडल्स हा प्रकार मूळचा चीन देशातला परंतु त्याच्या बनविण्याच्या सुटसुटीतपणामुळे संपूर्ण जगात प्रचंड लोकप्रिय झालेला आहे.

पण समस्या अशी आहे की ह्या नूडल्स सर्वाना आवडत असल्या तरी त्या आपल्याला घरी बनवता येत नाहीत आणि त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या मैद्याच्या नूडल्स खाव्या लागतात आणि मग आपल्यातली आई जागी होते आणि मुलांना नूडल्स खाण्यापासून आपल्याला नाईलाजाने परावृत्त करावे लागते. परंतु आता आपल्याला या नवीन नूडल्स मेकर या यंत्रामुळे खूप दिलासा मिळालेला आहे, आपण कोणत्याही पिठाच्या नूडल्स घरच्या घरी बनवून देऊ शकतो त्यामुळे पौष्टिक नूडल्स दिल्याचे आपल्याला समाधान आणि नूडल्स खायला मिळाल्याचा मुलांना आनंद.

बाजारात अनेक प्रकारचे नूडल्स मेकिंग मशीन आले आहेत परंतु या मशीनचे वैशिट्य असे की हे मशीन फुल्ली अटोमॅटिक आहे म्हणजे पीठ सुद्धा ते स्वतःच मळते. आपल्याला नुसते पीठ आणि पाणी त्यात घालावे लागते. केवळ 18 मिनिटांत २ ते ३ लोकांना पुरेल इतका ताजा  पास्ता किंवा नूडल्स आपण बनवू शकतो.

या मशीनमध्ये  स्पगेटी, पेने  किंवा फेटेचीनी या आकाराच्या चकत्या असतात. विशिष्ट आकाराच्या चकत्यांमुळे पास्ता किंवा नूडल्स सहजपणे बाहेर पडण्यास सोपे होते. वेगवेगळे पीठ वापरून आणि अंडी, हर्ब्स  किंवा पालक आणि गाजराचा रस यांसारखे वेगवेगळे घटक घालून तुम्ही पास्ताचे आणि नूडल्सचे विविध पौष्टिक प्रकार  बनवू शकता आणि ताजे ताजे मुलांना खायला घालू शकता म्हणजे मुले खुश आणि आईसुध्दा खुश आणि आरोग्यसुध्दा मजबूत.

या मशीनचा आकार सुटसुटीत आहे जो आपल्या स्वयंपाकघरात सहजपणे सामावून जाऊ शकतो. शिवाय याच्या चकत्या धुतल्यानंतर त्यामशिनध्येच ठेवायची  सोय आहे म्हणजे त्या ठरविण्याची चिंता नाही.

तर असे हे मस्त मशीन आपल्या घरी असायलाच हवे, इथे क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा हे मशीन.