थंडीसाठी पुन्हा वापरता येण्याजोगे दुहेरी थराचे क्लीनिंग ग्लोव्हज (हातमोजे)

मस्त गुलाबी थंडीतली प्रसन्न सकाळ, अंगात स्वेटर, मफलर किंवा कानटोपी आणि हातात वाफाळलेला आल्याचा चहा, अहाहा !!! काय मस्त कल्पना आहे ना ? थंडी मध्ये सर्वानाच काही काम न करता,  दुलई मध्ये मस्त गुरफटून बसावं असं वाटत.  पाण्यात तर अजिबात हात घालू नये असं वाटतं , पण काय करणार रोजची सकाळ झाली की गृहिणींना कामाच्या रागाड्याला जुंपून घ्यावं लागतं.  मुलांचा डबा तयार करायचा असतो, नाष्टा बनवायचा असतो, रोजचा स्वयंपाक करायचा असतो इत्यादी इत्यादी. किचन मध्ये काम करत असताना पाण्यात हात घालणे अपरिहार्य असतं, एरवीच ठीक असतं पण थंडीत मात्र जीवावर येतं. पण आता काळजी नको, खास थंडी साठी आले आहेत कोपराएवढे भांडी धुण्याचे किंवा साफसफाई करण्याचे हातमोजे.

हे हातमोजे बाहेरून पी व्ही सी मटेरिअलचे बनलेले आहेत आणि थंडीपासून वाचण्यासाठी आतून त्याला सुती कापडाचे अस्तर आहे. नेहमीचे रबरी हातमोजे थंडीमध्ये वापरावेसे  वाटत नाहीत परंतु ह्या हातमोज्यांना आतून सुती अस्तर असल्यामुळे हाताला अतिशय कोमल स्पर्श होतो आणि कामालासुध्दा उत्साह येतो. कोपरापर्यंत असल्यामुळे जरासुध्दा पाणी हाताला लागत नाही.

हे हातमोजे भांडी धुण्यासाठी, बाथरूम स्वच्छ, कपडे धुण्यासाठी  करण्यासाठी तसेच बागकाम किंवा इतर कामे करतानादेखील वापरण्यास अतिशय योग्य आहेत.

ह्या हातमोज्यांची पकड चांगली आहे. यांच्या पृष्ठभागावर छोटे छोटे गोळे असल्यामुळे साबणाची ताटली किंवा घसरड्या डिटर्जन्टच्या बाटल्या सुध्दा आपण व्यवस्थित पकडू शकतो. याच्या कफ ला इलॅस्टिक असल्यामुळे ते हाताला घट्ट बसतात आणि निसटत नाहीत.

तर आता होणार थंडी अतिशय सुसह्य ह्या हातमोज्यांमुळे. चला तर मग इथे क्लिक करा आणि मिळवा हे बहुउद्देशीय हातमोजे.

cleaning gloves for winters
Good texture
Cleaning gloves with cotton lining