मैत्रिणींनो मोबाईल नावाच्या छोट्या यंत्रामध्ये केवढे मोठे विश्व् सामावलंय ना ! हल्ली आपण आपल्या स्मार्टफोन शिवाय राहण्याची कल्पना तरी करू शकतो का ? आपल्याला सतत मेसेजेस बघायला , फेसबुक बघायला , बातम्या बघायला आणि सर्वात महत्वाचे पाककृती (रेसिपीज) बघायला या स्मार्टफोन चा केवढा तरी उपयोग होतो. पण एक समस्या आहे हा मोबाईल वापरायचा तर एक हात सतत व्यस्त राहणार, पण आपल्या बहुतांश मैत्रिणींना ते शक्य नसत मग अशा वेळेस आपल्याला वाटत कि मोबाईल बघायला देवानं एक अजून हात द्यायला पाहिजे होता…..खरं ना ? डोण्ट वरी Xtore आपल्यासाठी घेऊन आला आहे युनिव्हर्सल मोबाईल आणि टॅब होल्डर.

हा मोबाईल होल्डर सिलिकॉन चा असल्यामुळे फ्लेक्सिबल आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा टॅब हवा तसा फिरवू शकतो व पाहिजे त्या अंतरावर ठेवू शकतो. आपण कोणतेही काम करत असताना मोबाईल पाहू शकतो. झोपताना संगीत ऐकू शकतो. काही वेळेस झोपताना बरेचशे मेसेजेस वाचायचे असतात पण मोबाईल हातात धरायचा कंटाळा आलेला असतो अशा वेळेस हा मोबाईल होल्डर फारच उपयोगी पडतो. तसेच आपण मोबाईल वर बघून एखादी पाककृती करणार असतो तेव्हा मोबाईल कशाला तरी टेकवून ठेवावा लागतो आणि तरी तो तसा जास्त वेळ टिकेल कि नाही खात्री नसते तेव्हा देखील हा मोबाईल होल्डर मदतीला येतो.हल्ली बऱ्याच लोकांना स्वतःच्या कलेचे व्हिडीओज बनविण्याची आवड असते जस कि चित्रकला, पाककला वगैरे परंतु आपण आपली कला दाखवत असताना मोबाईल कोण धरणार हा प्रश्न असतो तो आता या मोबाईल होल्डर मुळे मिटला आहे.आपण मोबाईल हातात धरून पाहतो तेव्हा डोळे आणि स्क्रीन मधील अंतर कमी असते ज्याचा आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो विशेषतः लहान मुलांच्या पण हा फ्लेक्सिबल होल्डर वापरून आपण डोळे आणि मोबाईलच्या स्क्रीन मध्ये सुरक्षित अंतर ठेऊ शकतो.मोबाईलमुळे वृध्द् लोकांचे जीवन सुध्दा बरेच सुखकर झाले आहे, परंतु बराच वेळ मोबाईल हातात धरणे त्यांना शक्य होत नाही अशा वेळेस हा फ्लेक्सिबल मोबाईल होल्डर त्यांच्या फारच कामी येऊ शकतो.

सर्वांच्या घरात असायलाच पाहिजे असा हा छान सुटसुटीत फ्लेक्सिबल मोबाईल होल्डर तुम्ही इथे क्लिक करून आजच मागवू शकता.

मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चक्क गॅस वाचवणारे स्टॅन्ड. विश्वास नाही बसला ना ? पण हे खरं आहे. आपला गॅस जास्त जळण्याचं कारण म्हणजे हवा आणि आपल्या गॅस शेगडीची रचना अशी असते की हवा लागतेच आणि जास्त गॅस जळतो. पण आता आपण हे सगळं टाळू शकतो एक छोटेसे स्टॅन्ड वापरून. या स्टॅण्डमुळे हवे सोबत वाया जाणारा गॅस पूर्णपणे वापरला जातो. याच्या गोल आकारामुळे हे स्टॅन्ड सर्व प्रकारच्या शेगड्याना व्यवस्थित बसते.

यामुळे आपला स्वयंपाकाचा खूप वेळ वाचतो. बऱ्याचदा भांडे आकाराने लहान असेल तर गॅस शेगडी वरून ते घसरते, ती समस्या सुध्दा या स्टँडच्या वापराने सुटते.

सर्वांच्या घरी असायलाच हवे असे हे गॅस वाचवणारे स्टॅन्ड.
इथे क्लिक करून तुम्ही हे गॅस वाचवणारे स्टॅन्ड आत्ताच ऑर्डर करू शकता.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात तेलाचे खूप महत्व आहे, कळत न कळत आपण दिवसभरात बरच तेल वापरत असतो, मग ते अन्न पदार्थ बनविण्यासाठी असू दे, डोक्याला लावायला असू दे किंवा अंगाला मालिश करायला असू दे. नुसतं पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या तेलाचा विचार केला तरी त्यात बरेच प्रकार असतात त्यापैकीच रिफाईंड तेल.  हा प्रकार साधारण  ९० च्या दशकात भारतात  खूप लोकप्रिय होऊ लागला. रिफाईंड तेल बनविण्याची जी संपूर्ण क्रिया आहे त्यात खूप रासायनिक प्रक्रिया होतात आणि म्हणूनच आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

त्यामुळे हल्ली बरेच लोक रिफाईंड नसलेल्या तेलाकडे वळू लागलेत. खरंतर बाजारातून हे तेल आणण्यापेक्षा जर घरीच आपण तेलबियांपासून तेल काढू शकलो तर? ही कल्पनाच खूप मस्त आहे. हा ऑइल एक्सट्रॅक्टर वापरून आपण घरच्याघरी ताज  तेल काढू शकतो.

यामध्ये आपण शेंगदाणा, सुके खोबरे, तीळ, आक्रोड , सूर्यफुलाच्या बिया, जवस, बदाम, मोहरी  आणि बऱ्याच तेलबियांचे तेल काढू शकतो.

या यंत्राचा आकार छोटा आहे त्यामुळे आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात ते सहज सामावू शकते.  यावर डिजिटल डिस्प्ले आणि सॉफ्टटच बटन्स आहेत. त्यावर तेलबिया निवडायचे  पर्याय आहेत. वापरायला आणि  स्वच्छ करायला सोपे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तेलबियांमधून बाष्प काढायचे तंत्र आहे ज्यामुळे आपल्याला अगदी शुद्ध रूपातील तेल मिळते व त्या तेलाचे शेल्फ लाईफ पण जास्त असते.

हे यंत्र कठीण आणि तेलाचा अंश कमी असलेल्या तेल बियांमधून तेल काढू शकत नाही उदा. सोयाबीन, मका इत्यादी.

आधुनिक होत असताना आपण आपले आरोग्य सांभाळणे देखील महत्वाचे आहे. आपण जर हा ऑइल एक्सट्रॅक्टर आणला तर शुद्ध तेल वापरल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. तेल काढल्या नंतर जी पेंड मिळते तिचाही आपण उत्तम प्रकारे वापर करू शकतो.

इथे क्लिक करून आपण आजच हे यंत्र मागवू शकता.

आपल्याला हल्ली भरपूर भाजी, फळे आणि इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी घरात आणून ठेवाव्या लागतात, परंतु जर लवकर वापरल्या गेल्या नाहीत तर अशा गोष्टी खराब होण्याची शक्यता असते. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण त्यासाठी व्हॅक्युम सीलिंग मशीन आले आहे. खरंतर पदार्थ हवेच्या संपर्कात आले की ते खराब होतात, त्यासाठी आपण ते ज्या कंटेनरमध्ये ठेवतो तिथे हवेचा संपर्क झाला नाही तर तो पदार्थ बरेच दिवस टिकू शकतो, व्हॅक्यूम सीलिंग मशीन अगदी हेच काम करते. फळे किंवा भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवण्याआधी एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवतो आणि  ते जर खूप दिवस तसेच ठेवले गेले तर फ्रिजमध्येसुद्धा खराब होतात  पण जर का आपण त्यातली संपूर्ण हवा काढून टाकली तर ते दीर्घकाळ टिकू शकतात.

कोणत्याही पदार्थाची मूळ स्थिती दीर्घकाळासाठी आहे अशीच ठेवण्यासाठी आपल्याला तो व्हॅक्युम मध्ये ठेवावा लागतो म्हणजेच हवेचा संपर्क अजिबात टाळवा लागतो. त्यासाठी हे व्हॅक्युम सिलिंग मशीन फारच उपयोगी आहे. हे मशीन वापरण्यासाठी आपल्याला  खास त्यासाठी बनविलेल्या प्लास्टिक बॅग्सचा वापर करावा लागतो.

वापरायला हे मशीन अतिशय सोपे आहे, बस एक बटण दाबले कि काम होते. यावरच्या  एल इ डी इंडिकेटर लाईटमुळे ते चालू आहे कि बंद हे आपल्याला समजते. जो पदार्थ आपल्याला व्हॅक्युम सील करायचा आहे त्याला खास त्यासाठी बनविलेल्या प्लास्टिक पिशवी मध्ये घालायचा असतो मग ते मशीन सुरु करून त्या पिशवीचे तोंड काळ्या रंगाच्या सिलिंग रिंग मध्ये ठेवायचे आणि ते वरून बंद करायचे आणि नंतर हिरव्या रंगाचा स्विच चालू करायचा. हे मशीन त्या पिशवी मधली सगळी हवा काढून टाकते आणि पदार्थ व्हॅक्युम सील होतो.     

हे मशीन वापरून आपण कोणत्याही भाज्या, फळे, मटण, मासे , शिजवलेले अन्न, सुकामेवा असे बरेच पदार्थ दीर्घकाळ टिकावू शकतो. याचा वापर केल्याने स्वयंपाकघरात होणारी अन्नाची नासाडी आपण टाळू शकतो.

असे हे अत्यंत उपयुक्त मशीन घ्या आणि अन्नाची नासाडी टाळा.

इथे क्लिक करून तुम्ही हे व्हॅक्युम सिलिंग मशीन आत्ताच मागवू शकता.

‘तंदूर रोटी’ , नाव घेतल्या बरोबर असं खमंग खुशखुशीत रोटी आपल्या डोळ्यासमोर येते. तर अशी ही तंदूर रोटी आपल्याला खावीशी वाटली तर हॉटेल मध्ये जावे लागते, घरी हॉटेलसारखी बनवता येत नाही कारण का तर आपल्याकडे तंदूर भट्टी नाही ना. पण हा  इलेक्ट्रिक तंदूर आपली तंदूर केलेले पदार्थ खायची इच्छा घरीच पूर्ण करतो. तंदूर भट्टीला जशी जास्त जागा लागते तस या इलेक्ट्रिक तंदूरच नाही, हे  अतिशय हलके आणि घरात कुठेही सामावू शकणारे असे  सुटसुटीत  यंत्र आहे.

या मध्ये फक्त तंदूर रोटीच नाही तर केक, बिस्किट्स, तंदूर चिकन, मासे, कबाब, पिझ्झा असे कितीतरी विविध पदार्थ आपण करू शकतो. या तंदूरच विशेष म्हणजे अगदी झटपट पदार्थ बनतात. तंदुरी पदार्थ सर्वाना खूप आवडतात अगदी शाकाहारी असू देत नाहीत तर मांसाहारी असू देत, सगळ्या पद्धतीचे तंदूर करता येतात. मुलांना जर भाज्या खायला आवडत नसतील तर भाज्यांचे तंदूर प्रकार करून आपण त्यांना भाज्या खायची आवड लावू शकतो.

तंदूर वापरण्यासाठी त्याला प्री हिट करण्याची गरज नाही. हा शॉक प्रूफ आहे. कोणीही सहज वापरू शकतो. वजनाला हलका असल्यामुळे आपण हा ट्रिपलासुद्धा घेऊन जाऊ शकतो. पदार्थ अगदी कमी वेळेत होत असल्यामुळे , ऐन वेळी कोणी पाहुणे आले तर अगदी झटपट पदार्थ बनवू शकतो.

हा स्वच्छ करायला सुध्दा अतिशय सोपा आहे.

आधुनिक युगात सर्वांच्या घरी असायलाच हवा असा हा इलेक्ट्रिक तंदूर इथे क्लिक करून तुम्ही आजच मागवू शकता.

पीठ मळणे हा बरेचशे पदार्थ बनविण्यामधला एक महत्वाचा आणि कंटाळवाणा भाग आहे. आपल्या भारतीय परंपरेत तर स्वयंपाक शिकण्याची सुरुवातच पीठ मळायला शिकण्यापासून होते. आपल्या रोजच्या जेवणात चपाती, भाकरी, रोटी, नान, पराठा वगैरे असतातच त्यासाठी पीठ मळणे हे काम दर दिवसाला जवळपास सर्वांच्या घरी होतच असते. वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ मळावे लागते उदा. घट्ट, मऊ , मध्यम इत्यादी. तर असे हे पीठ मळणे आता एकदम सोपे झाले आहे पीठ मळायच्या यंत्रामुळे.

स्त्री मग ती कोणीही असो फक्त गृहिणी असो की नोकरी व्यवसाय करणारी असो पीठ मळण्याच्या यंत्राने तिचे खूपच काम सोपे झाले आहे. या यंत्रामध्ये आपण अगदी चपाती, भाकरी पासून ते पिझ्झा, बर्गर पर्यंत कसलेही पीठ अगदी काही सेकंदामध्ये मळू शकतो.

सणासुदीच्या दिवसात तर आपल्याला विविध पदार्थांसाठी विविध पीठे माळवी लागतात जस कि चकल्या, करंज्या, शंकरपाळे इत्यादी त्यावेळेस देखील या यंत्राचा खूप उपयोग होतो.

हे यंत्र वापरायला आणि स्वच्छ करायलादेखील सोपे आहे.  यामध्ये स्टेनलेस स्टीलचे एक गोलाकार भांडे असते त्यात पीठ मळले जाते. पीठ मळून झाल्यावर भांडे पटकन धुवून टाकता येते व त्वरित स्वच्छ होते.

इथे क्लिक करून पीठ मळण्याचे यंत्र तुम्ही लगेचच मागवू शकता.

मैत्रिणींनो धान्य दळायला टाकणे आणि ते आणणे नाही म्हणलं तरी नकोसं  काम वाटतं. कधी कधी आपल्या ऑफिसच्या कामांमुळे दळण विसरलं जातं, तेव्हा असं वाटत की पटकन पीठ मिळालं तर किती बरं होईल. तर आता आपली दळणाची समस्या कायमची सुटली आहे आधुनिक आटाचक्कीमुळे.

भारतीय खाद्य परंपरेनुसार आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खातो. जसं कि उन्ह्याळ्यात नाचणीची भाकरी किंवा हिवाळ्यात बाजरीची भाकरी वगैरे.शिवाय आपल्याला वेगवेगळी पीठे हाताशी  असण्याची सवय असते, जसं कि बेसन, तांदळाची पिठी इत्यादी. आपण हि सर्व पीठे गिरणीतून दळून आणतो परंतु ती आपल्याला आपल्या वेळेत मिळतील याची खात्री नसते, त्यासाठी आपल्याला खूप आधी पूर्वनियोजन करून घरातील पीठ संपायच्या आधी दळून आणावे लागते. परंतु  आपण आता आटाचक्कीचा वापर करून घरच्या घरी आपल्याला हवे ते व हवे तेवढे धान्य हव्या त्या वेळी दळू शकतो.

आटाचक्की वापरून काही मिनिटामध्ये आपण धान्य दळू शकतो. ना कुठे धान्य उचलून न्यायची झंझट ना गिरणीत थांबण्याची कटकट.  कोणतंही धान्य, डाळी आणि अगदी हळद, मिरच्यांसारखे मसालेदेखील आपण आटाचक्की मध्ये पटकन दळू शकतो.

आधुनिक स्त्रीच्या हाती अगदी असायलाच हवी ही आटाचक्की किंवा जिला आपण घरघंटी सुध्दा म्हणतो. ही आटाचक्की आपला खूप वेळ वाचवते. शिवाय धान्य दळायला येणार खर्चदेखील कमी असतो.

ताज्या ताज्या दळलेल्या पीठामध्ये सर्व पोषकतत्वे जशीच्या तशी  मिळतात उदा. प्रथिने(प्रोटिन्स), व्हिटॅमिन्स, कर्बोदके(कार्बोहायड्रेट्स) इत्यादी.

या ही आटाचक्की एका तासात जवळपास ७ ते ८ किलोग्रॅम धान्य दळू शकते. यामध्ये वेगवेगळ्या जाळ्या मिळतात जेणेकरून आपण आपल्याला हव्या त्या जाडीचे पीठ दळू शकतो.  या आटाचक्की मध्ये आपण गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, बेसन, हळद, मूग आणि बऱ्याच गोष्टी दळू शकतो.  शिवाय आपण घरच्या घरी वेगवेगळ्या धान्यांचा रवासुध्दा काढू शकतो.

ही डबल डोअर असणारी आटाचक्की तर खूप  उपयोगी आहे कारण यामध्ये साठवणुकीसाठी जास्तीची जागा आहे. याच्या बिजागरी गोल आहेत शिवाय वरील दार हे अतिशय हळुवारपणे बंद होते (सॉफ्ट क्लोजिंग ).

ही विजेवर चालणारी आटाचक्की आहे. वापरायला आणि स्वच्छ करायला एकदम सुलभ आहे. मध्ये १ एच पी ची इलेक्ट्रिक मोटर आहे. मोटर स्पीड २८८० आर पी एम एवढा आहे. बऱ्याच आटाचक्कीमध्ये मोटारीची १० वर्षांची गॅरंटी मिळते व बाकीच्या पार्ट्सची २ वर्षांची गॅरंटी मिळते. फक्त त्यातल्या प्लास्टिक आणि रबरी भागांची कसलीही गॅरंटी मिळत नाही.कटर-चेंबर ची कायमची  गॅरंटी मिळते.

चला तर मग अजिबात वेळ न दवडता इथे क्लिक करून लगेचच ऑर्डर करा आटाचक्की.

स्वयंपाकघरात आपल्याला सतत पाण्याची आवशकता असते. भाज्या व फळे  धुणे, भांडी घासणे, कट्टा स्वच्छ करणे इत्यादी गोष्टींसाठी आपण सतत पाण्याचा वापर करत असतो.  यातील सर्व गोष्टींना आपण पाण्याचा एकसारखाच वेग वापरतो जो की आपल्या पाण्याच्या नळातून येतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते व कधी कधी आपले समाधान देखील होत नाही.  काही वस्तू धुण्यासाठी आपल्याला पाण्याच्या जास्त दाबाची गरज असते, बहुतेकवेळा कट्ट्यावर लावलेला नळ एकाच जागी स्थिर असतो, परंतु काही कामे अशी असतात कि नळ फिरता असेल तर पाण्याचा जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो.

फिरणाऱ्या तोटीचे खूप उपयोग असतात. आपल्या सिंकचा कोणताही कोपरा आपल्याला अगदी सहज स्वच्छ करता येतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण तो वाकवू शकतो.

यामध्ये तीन प्रकारचे स्प्रे असतात  जेट, शॉवर आणि जेट + शॉवर मोड जे आपण आपल्या  गरजेनुसार निवडू शकतो. हा पाण्याचा  नळ उच्च दर्जाचे ABS प्लास्टिक, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉनचा  बनलेला आहे, आणि महत्वाचे म्हणजे दीर्घकालीन वापरासाठी टिकाऊ आहे.

याच्या वापराने पाण्याची जवळपास ५०% पर्यंत बचत होते.  आपल्या हि तोटी नळाला लावता येते त्यामुळे आधीच असलेला नळ बदलण्याची आवश्यकता नाही. तोटी नळाला लावायलासुध्दा सोपी आहे व कोणत्याही साधनांशिवाय आपण हि तोटी नळाला सहजपणे लावू शकतो.

तोटीचा प्लॅस्टिक तळ स्वच्छ करण्यासाठी वेगळा करता येण्याजोगा आहे. यावर लवकर गंज चढत नाही.

इथे क्लिक करून तुम्ही हि अतिशय उपयुक्त्त तोटी आत्ता खरेदी करू शकता.

एअर फ्रायर हे एक लहान इलेकट्रीक उपकरण आहे जे खूप कमी तेलात किंवा तेलविना पदार्थ तळण्यासाठी बनविले आहे. अन्न तेलात न बुडवता खोल तळण्याचे (डीप फ्राय) फक्त अनुकरण केले जाते, पण पदार्थ मात्र डीप फ्राय केल्यासारखाच बनतो. यामध्ये अतिशय कमी तेलात काम केले जाते, ज्यामुळे आपले आरोग्य राखण्यास मदत होते. अतितेलाचा वापर हे आपले आरोग्य बिघडण्याचे कारण आहे, जे या एअर फ्रायर मुळे टाळता येते.

एअर फ्रायरचे कुकिंग चेंबर अन्नाजवळील गरम घटकातून उष्णता पसरवते आणि यामध्ये असलेला पंखा उच्च वेगाने गरम हवा फिरवतो व पदार्थावर एक कुरकुरीत थर तयार होतो. तापमान 250 डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते, हे ज्या त्या मॉडेलवर अवलंबून असते. एअर फ्रायरमध्ये स्वयंपाकास लागणारा वेळ २0%  किंवा त्यापेक्षाही कमी लागू शकतो.

पारंपारिक तळण्याच्या पद्धती १४0 ते १६५ °C (२८४ ते ३२९ °F) तापमानात पाण्याच्या उकळत्या बिंदूच्या वर, गरम तेलात अन्न पूर्णपणे बुडवून मेलार्ड इफेक्ट निर्माण करतात. एअर फ्रायर इच्छित अन्न तेलाच्या पातळ थरात कोटिंग करून २00 डिग्री सेल्सिअस (३९२ ° फॅ) पर्यंत गरम केलेल्या हवेला उष्णता लागू करण्यासाठी आणि प्रतिक्रिया सुरू करण्यासाठी कार्य करते. याचा परिणाम म्हणजे , हे उपकरण पारंपरिक डीप फ्रायरपेक्षा ७0% ते ८0% कमी तेल वापरून बटाटा चिप्स, चिकन, फिश, स्टेक, चीजबर्गर, फ्रेंच फ्राईज किंवा पेस्ट्रीसारखे पदार्थ खरपूस  बनवू शकते. बहुतेक एअर फ्रायर्समध्ये तापमान आणि टाइमर अडजस्टमेंट्स असतात ज्यामुळे  स्वयंपाक अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. अन्न त्यामध्ये असलेल्या एका बास्केटमध्ये  शिजवले जाते जे ड्रीप ट्रेवर बसविलेले असते

एअर फ्रायर मध्ये अन्न शिजविण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम जे अन्न शिजवायचे आहे ते बास्केट मध्ये ठेवा
  2. त्यानंतर  वेळ आणि तापमान सेट करा.
  3. आता अन्नाला शिजू द्या. कधी कधी आपल्याला मध्येच पदार्थ उलटवावा लागतो ज्याने तो सर्व बाजूनी कुरकुरीत होतो

याची क्षमता ३.५ लि. ची आहे.. एअर फ्रायर स्वच्छ करायला देखील सोपा असतो व डिश वॉशर सेफ असतो.

फ्रोझन  फूड ज्याला डीप फ्राय ची गरज असते जसे कि फ्रेंच फ़्राईस, मोझारेला स्टिक्स, चिकन नगेट्स इ., तश्या प्रकारचे अन्न बनवू शकतो, किंवा ताजे अन्न देखील बनवू शकतो. यामध्ये चिकन, फिश आणि मटण देखील उत्तम बनते. ज्याला बेक करावे लागते अशा असे अन्नपदार्थ बनवू शकतो जसे की कुकीज.

हल्ली आपण आपल्या आरोग्याविषयी खूपच जागरूक झालो आहोत त्यामुळे कमी तेलात पदार्थ बनवून आपण आपले आरोग्य नक्कीच राखू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच हे यंत्र खरेदी करू शकता

साधारण ९० च्या दशकात भारतामध्ये फूड प्रोसेसर ही संकल्पना आली आणि त्याचे खूप सारे उपयोग पाहता हळू हळू मूळ धरू लागली इतकी की आता आपण फूड प्रोसेसरविना मॉडर्न किचनची  कल्पनाच करू शकत नाही. फूड प्रोसेसर या नावावरूनच लक्षात येत की त्यात फूडवर म्हणजेच अन्नावर काही प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया केली जाते.  स्वयंपाक घरात अशा बऱ्याच क्रिया असतात ज्या वारंवार कराव्या लागतात जसे की बारीक तुकडे करणे, काप करणे, चिरणे, किसणे इत्यादी, सोप्या वाटत असल्या तरी फारच वेळखाऊ असतात. सध्याच्या वेगवान काळात आपल्याला सर्व गोष्टी जलद गतीने करायच्या असतात त्यामुळे फूड प्रोसेसर हा अतिशय उत्तम पर्याय ठरतो.

फूड प्रोसेसर हे एक अष्टपैलू विद्युत उपकरण आहे जे तुम्हाला विविध प्रकारे सर्व प्रकारचे पदार्थ कमी वेळेत तयार करण्यास मदत करते . चिरण्यापासून ते पीठ मळण्यापर्यंत, फूड प्रोसेसर अनेक कामे त्वरीत करू शकतो जी आपल्याला हाताने  पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. फूड प्रोसेसरचा आकार  रुंद आणि प्रशस्त असतो, त्यामुळे जरी मोठया प्रमाणात जेवण बनवायचे असले तरी काम खूप लवकर आणि सहज होते. फूड प्रोसेसर सोबत बऱ्याच ॲटॅचमेण्टस मिळतात ज्यांचा उपयोग आपल्याला किसणे, विविध आकाराचे छोटे काप – मोठे काप करणे, पदार्थ एकदम बारीक करणे, तुकडे करणे इत्यादीसाठी होतो. काही प्रोसेसर्स  बाउल इन्सर्टसह देखील येतात जे आपल्याला  एकाच वेळी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विविध प्रोसेसिंग करण्यास मदत करतात.

अजून एक सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे पीठ मळणे. आपल्या भारतीय स्वयंपाकात चपाती, पोळी, रोटी, पराठा इत्यादी पदार्थ आवर्जून असतातच आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पीठ मळावे लागते. पीठ मळणे ही क्रिया तशी फार वेळखाऊ असते आणि फारशी कोणाला आवडणारी नसते अशा वेळेस फूड प्रोसेसर आपल्या मदतीला धावून येतो. आपण फूड प्रोसेसर मध्ये अवघ्या एक ते दोन मिनिटामध्ये कोणत्याही पद्धतीने पीठ मळू शकतो उदा. मऊ, घट्ट, सैल  इत्यादी. आपण त्यात चपाती, पोळी इत्यादींसोबतच भाकरी, चकली, करंज्या, शंकरपाळीचे सुध्दा पीठ मळू शकतो. फूड प्रोसेसर गोल गोल फिरत असल्याने पीठ हवे तसे व्यवस्थित मळले जाते.

ह्या  फूड प्रोसेसरला १२ फंक्शस आहेत. ३ मिक्सरची भांडी आणि एक फूड प्रोसेसिंगचे भांडे आहे म्हणजे मिक्सर आणि फूड प्रोसेसर आपल्याला एकाच मशीन मध्ये मिळतो. शिवाय यामध्ये लिंबू वर्गीय फळे जसे की संत्री, मोसंबी इत्यादीसाठी स्पेशल ज्युसरची ॲटॅचमेण्ट तसेच इतर फळांसाठी सेंट्रल ज्युसरची ॲटॅचमेण्ट आहे. दोन प्रकारचे स्पीड सेटिंग्स तसेच पल्स पण आहे. सुरक्षिततेसाठी सेफ्टी लॉक आहे. याचे विविध ब्लेड्स आणि प्रोसेसिंगच्या चकत्या ठेवण्यासाठी याच्या आतमध्येच एक ड्रॉवर आहे, म्हणजे ब्लेड्स आणि चकत्या हरवण्याचा प्रश्नच नाही.

हा फूड प्रोसेसर संपूर्ण भारतीय बनावटीचा असून याची फ्री होम सर्व्हिस आहे.

इथे क्लिक करून हा फूड प्रोसेसर तुम्ही आत्ता खरेदी करू शकता.