Veg Peeler

सध्याचा काळ हा प्रेसेंटेशनचा आहे मग ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्रोजेक्टचे असो किंवा लग्न समारंभाचे असो वा खाद्य पदार्थांचे असो  ते उत्तमच झाले पाहिजे. हॉटेल्स मध्ये, पार्टीजना हल्ली पदार्थ छान सजवून देतात.  आताच्या कुकरी शोज, यु ट्यूब रेसिपी चॅनेल्समुळे आपण देखील पदार्थ सजवू लागलोय आणि त्यासाठी आपल्याला नवीन साधनांची गरज पडते जसे की ही साल काढणी. पारंपरिक साल काढणी जवळपास सर्वांच्याच घरी असते. तिचा उपयोग आपण बटाट्याची साले काढणे, दोडक्याच्या शिरा काढणे, गाजर सोलणे इत्यादीसाठी होतो.आता साल काढणी मध्ये देखील खूप नवीन तंत्रज्ञान आले आहे ज्यामुळे फळे व भाज्यांची साले काढणे अजून सोपे झाले आहे.नवीन पद्धतीच्या साल काढणीचा उपयोग आपण भाज्यांची साले काढण्या बरोबरच अजून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो जसे की,

सफरचंद किंवा काकडीचे पातळ काप करून त्यांची गुलाबासारखी फुले बनविणे जी पदार्थ सजविण्यासाठी खूप आकर्षक वाटतात.

गाजर, झुकिनी, काकडी , बीट इत्यादींचे सलाड मध्ये घालण्यासाठी एकसारखे उभे काप (किसल्यासारखे ) करणे.

केकवर घालण्यासाठीचे चॉकलेट कर्ल बनविणे.

सजावटी साठी चीजचे व बटरचे देखील आपण पातळ काप करू शकतो.

ही स्टेनलेस स्टीलची साल काढणी एकदम गुळगुळीत, धरायला सोपी आणि आरामदायी आहे. हिचा वापर करून जास्त जोर न लावता आपण सहजपणे साले काढू शकतो.

हे उत्पादन उच्च दर्जाच्या सामग्रीने  बनविले आहे. ह्या साल काढणीवर गंज चढत नाही, डाग पडत नाहीत, शिवाय स्टेनलेस स्टीलची असल्यामुळे स्वच्छ करायला देखील सोपी आहे. ही अतिशय मजबूत आणि टिकाऊ आहे.

अशी ही छोटीशी नवीन पध्द्तीची साल काढणी आपल्या घरी असायलाच हवी ज्यामुळे आपल्याला झटपट पदार्थ सजविता येतो. मग ऐनवेळेला आलेले पाहुणे असू देत नाहीतर आपल्या रुसलेल्या लहानग्याचा रुसवा काढायचा असू दे बस काही क्षणात आपण पदार्थ अगदी उत्तम प्रकारे सजवू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच  ही साल काढणी  खरेदी करू शकता

ज्यूस किंवा मराठीत आपण ज्याला फळांचा रस असे म्हणतो तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पौष्टिक व स्वादिष्ट असतो. डॉक्टर्ससुद्धा आपल्याला आहारामध्ये फळांचा रस समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. एखाद्या आजारानंतर ताकद लगेच भरून येण्यासाठी ज्यूस पिण्यासारखा सोपा उपाय नाही. लहानमुलांना खेळून झाल्यावर लगेच ऊर्जा मिळण्यासाठी ज्यूस देतात, किंवा मोठे मोठे खेळाडू देखील खेळल्यानंतर ज्यूस पिणेच पसंत करतात. परंतु ज्यूस हा नेहमी ताजा पिणे गरजेचे आहे.

ताजा ताजा ज्यूस बनविणे वेळखाऊ काम असते विशेषतः फळांमधल्या बिया काढण्याचे काम.मिक्सर मध्ये ज्यूस काढायचा तर विचारायलाच नको. आधी बिया काढा, मग ज्यूस झाल्यावर तो गाळून घ्या इत्यादी किचकट गोष्टी कराव्या लागतात व आपला वेळही जातो.

पण या हँड ज्युसरमुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ना बिया काढण्याची झंझट ना गाळायची खटपट बस फळांच्या फोडी करा ज्युसरमध्ये घाला आणि हॅन्डल दाबा की झाला ज्यूस तयार.

हा ज्युसर उच्च प्रतीच्या ऍल्युमिनिअम आणि इतर मिश्र धातूंपासून बनला आहे.याचे पी पी लेअर्स फूड ग्रेडेड असल्यामुळे हा वापरण्यासाठी सुरक्षित आहे.याच्या त्रिकोणी नोझलमुळे ज्यूस ओतत असताना तो सांडत नाही व आपण स्थिरपणे ओतू शकतो. हेवी ड्युटी अलॉय बॉडीमुळे तुमचे हात कधीही घसरणार नाहीत, तळाच्या डिझाइनमुळे ज्युसर सहज आणि स्थिरपणे टेबलवर ठेवता येतो.

हे गंज प्रतिरोधक आहे आणि फळांवर कसलीही रिअक्शन होत नाही किंवा जीवाणू देखील वाढत नाहीत त्यामुळे एकदम सुरक्षित आहे

हा ज्युसर स्वच्छ करायला एकदम सोपा आहे याचे भाग सुटे होतात त्यामुळे वापरून झाल्यावर प्रत्येकवेळी ते वेगळे करून पाण्याने स्वच्छ धुता येतात. पाण्याने धुतल्यावर कोरडे करणे गरजेचे आहे.फक्त हा डिशवॉशर मध्ये धुता येत नाही.

हा ज्युसर सहज हातातून नेता येण्याजोगा असल्यामुळे आपण कुठेही नेऊ शकतो व ताजा ज्यूस पिण्याचा आनंद घेऊ शकतो व लगेच स्वच्छ सुध्दा करू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता हा ज्युसर खरेदी करू शकता.

सर्व वयोगटातील लोकांना  फिंगर चिप्स आवडतात. फिंगर चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाट्याचे लांब लांब कापून तळलेले तुकडे जे आपल्याला घरी सहजपणे बनवता येतात.हे खायला अतिशय रुचकरअसले तरी ते बनविण्यासाठी बटाटा एकसारख्या लांब लांब आकारात कापणे हे एक फारच कंटाळवाणे काम असते शिवाय ते काप एकसारखे झाले नाहीत तर फिंगर चिप्स छान वाटत नाहीत. परंतु हे फिंगरचिप्स बनविण्याचे यंत्र आपण वापरले तर काही मिनिटातच आपण बटाट्याचे एकसारखे लांब काप करू शकतो. 

हे वापरण्याची पद्धत पण खूप सोपी आहे,बस हॉपरमध्ये बटाटा ठेवा आणि हँडल दाबा की झाल्या आपल्या फ्रेंच फ्राईज किंवा फिंगरचीप्स चिरुन तयार.

याचा वापर आपण गाजर, काकडी इ. भाज्यांचे काप करण्यासाठी देखील करू शकतो, जे आपण सलाड मध्ये वापरतो.

हे यंत्र वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास अतिशय सोपे आहे. याचे सर्व भाग सुटे होऊ शकतात. परंतु आपण हे डिशवॉशर मध्ये स्वच्छ करू शकत नाही.  

याचे कटिंग ब्लेड्स खूप शार्प आहेत त्यामुळे बटाटे आणि इतर भाज्या आपण सहजपणे कापू शकतो.यासोबत  दोन कटिंग ग्रीडस (जाळ्या) व दोन पुशर प्लेट येतात.चला तर मग रेस्टोरंट सारखे फ्राईज आता घरीच बनवा.

सध्याच्या काळात घरात एखादा छोटासा वजनकाटा असणे ही आवश्यक बाब झाली आहे कारण हल्लीच्या मॉडर्न गृहिणी बरेच वेगवेगळे- हॉटेलसारखे किंवा परदेशी -पदार्थ घरीच बनवू लागल्या आहेत, त्यासाठी त्यामध्ये घालायचे जिन्नस हे अगदी मोजून मापून घेतलेले असणे गरजेचे असते. पूर्वीच्या वाटी आणि चमच्याच्या मापापेक्षा अगदी अचूक मापाने जिन्नस मोजून घेतले तर पदार्थ बिघडण्याची शक्यता बरीच कमी असते.

हल्ली बरेचजण डाएट करतात तर अशावेळी अन्नपदार्थ मोजून घ्यावे लागतात तेव्हादेखील या वजनकट्याचा खूप उपयोग होतो किंवा घरी कोणी पेशंट असेल तर तेंव्हासुध्दा याचा बराच उपयोग होतो.

घरगुती वापरासाठी मोठा – भाजीवाल्यांकडे असतो तसा – वजनकाटा घेऊन उपयोग नसतो कारण तो फार मोठा असतो व अचूक वजन करण्यासाठी बरीच खटपट करावी लागते. परंतु या इलेकट्रोनिक वजनकट्याने आपले सगळे त्रासच कमी केले आहेत.

या वजनकट्याचा जो डिस्प्ले आहे तो छान मोठा आहे त्यामुळे वजन वाचताना डोळे अगदी बारीक करावे लागत नाहीत व वाचायला सोपे होते. डेटा स्थिर असताना वाचन स्वयंचलितपणे लॉक होते. 

अतिशय अचूक असणारा हा वजनकाटा अत्यंत कमी वीज वापरतो. तसेच बॅटरी कमी झाली आहे हे दाखवणारा इंडिकेटरदेखील त्यावर आहे.

हा घरगुती वापरासाठीचा आणि छोटा असल्याने ह्याची कमाल क्षमता १० किलोची आहे. त्याचे स्वतःचे वजन ४०० ग्रॅमच्या आसपास आहे त्यामुळे सहज हातातून नेता येण्याजोगा आहे.

वस्तूच्‍या वरील वेष्‍टणाच्‍या वजनानुसार वस्तूच्‍या एकूण वजनात वजावट करण्याचे एक फंक्शनदेखील आहे.

स्वयंचयामध्ये ऑटोमॅटिक शून्य करणे व ३ सेकंदांनी ऑटोमॅटिक बंद होणे हे फंक्शन्ससुध्दा आहेत.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच हा वजनकाटा खरेदी करू शकता.

Weighing machin

हॅन्ड ब्लेंडर हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. ताक घुसळणे किंवा केकचे मिश्रण करणे या सारख्या कामांसाठी फार उपयोगी पडतो. हा ब्लेंडर वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास अतिशय सोपा आहे शिवाय आकारही छोटा असल्यामुळे किचनमध्ये छोट्या जागेत बसू शकतो.

हे मल्टी-फंक्शनल उपकरण पॉवरफुल चॉपर, डिटॅचेबल  स्टेनलेस-स्टील ब्लेंडिंग वँड, मल्टी-पर्पज ६00 मिली जार आणि व्हिस्करसह येते. ड्युअल-स्पीड सेटिंगमुळे आपण हँड ब्लेंडर आपल्याला हवा तसा नियंत्रित करू शकतो. व्हेरिएबल स्पीड आपल्याला आपल्या पदार्थांचे  योग्य  टेक्शर(पोत) मिळविण्यात मदत करते. याचे अँटी-स्लिप डिझाइन आणि आरामदायक पकड आहे. या ब्लेंडरचे फिनिश स्टेनलेस स्टीलचे आहे.

यात दोन स्पीड आहेत. त्यामुळे योग्य स्पीड निवडून तुम्ही हवं तसं टेक्श्चर मिळवू शकता. हातात नीट पकडता यावं यादृष्टीने त्याचं खास डिझाइन तयार करण्यात आलं आहे. शिवाय, या ब्लेंडरसह व्हिस्क करताना पदार्थ इकडेतिकडे उडत नाही. यातल्या सगळ्या अटॅचमेंट्स अगदी सहज बसवता आणि काढता येतात.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता हा हॅन्ड ब्लेंडर खरेदी करू शकता

garlic crusher

लसूण हा आपल्या भारतीय खाद्यपदार्थातला एक फार म्हणत्वाचा घटक आहे. लसणाशिवाय फोडणीचा आपण विचार देखील करू शकत नाही. तसं पाहायला गेलं तर लसणामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात.

लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे.कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.लसणामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी – फंगल आणि अँटी – व्हायरल हे गुणधर्म आहेत.वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठीदेखील लसणाचा उपयोग होतो.

तर असा हा बहुगुणी लसूण बारीक करण्याचे मोठेच काम असते, त्यामुळेच ह्या लसूण बारीक करणाऱ्या यंत्राचा आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप उपयोग होतो.

आपण या लसूण क्रशरचा वापर करुन काही सेकंदांत  लसूण पाकळ्या आणि आलं सहजपणे  सोलू  शकतो.

 हे लसूण क्रशर उच्च-गुणवत्तेचे, फूड-ग्रेड 304 स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे जेणेकरून आपल्याला गंजण्याबद्दल अजिबात चिंता करण्याची गरज नाही.  

हे फक्त लसूणच नाही तर ते आलेदेखील बारीक करू शकते.

हे यंत्र स्वच्छ करणे सोपे आहे. फक्त आपल्या नळाखाली धुवा किंवा डिशवॉशरमध्ये स्वच्छ धुवा.

अतिशय सोपे सुटसुटीत असे हे यंत्र प्रत्येक घरात असायलाच हवे असे आहे.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच हे यंत्र खरेदी करू शकता