तेलबियांपासून तेल काढायचे यंत्र

आपल्या सर्वांच्या आयुष्यात तेलाचे खूप महत्व आहे, कळत न कळत आपण दिवसभरात बरच तेल वापरत असतो, मग ते अन्न पदार्थ बनविण्यासाठी असू दे, डोक्याला लावायला असू दे किंवा अंगाला मालिश करायला असू दे. नुसतं पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या तेलाचा विचार केला तरी त्यात बरेच प्रकार असतात त्यापैकीच रिफाईंड तेल.  हा प्रकार साधारण  ९० च्या दशकात भारतात  खूप लोकप्रिय होऊ लागला. रिफाईंड तेल बनविण्याची जी संपूर्ण क्रिया आहे त्यात खूप रासायनिक प्रक्रिया होतात आणि म्हणूनच आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

त्यामुळे हल्ली बरेच लोक रिफाईंड नसलेल्या तेलाकडे वळू लागलेत. खरंतर बाजारातून हे तेल आणण्यापेक्षा जर घरीच आपण तेलबियांपासून तेल काढू शकलो तर? ही कल्पनाच खूप मस्त आहे. हा ऑइल एक्सट्रॅक्टर वापरून आपण घरच्याघरी ताज  तेल काढू शकतो.

यामध्ये आपण शेंगदाणा, सुके खोबरे, तीळ, आक्रोड , सूर्यफुलाच्या बिया, जवस, बदाम, मोहरी  आणि बऱ्याच तेलबियांचे तेल काढू शकतो.

या यंत्राचा आकार छोटा आहे त्यामुळे आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात ते सहज सामावू शकते.  यावर डिजिटल डिस्प्ले आणि सॉफ्टटच बटन्स आहेत. त्यावर तेलबिया निवडायचे  पर्याय आहेत. वापरायला आणि  स्वच्छ करायला सोपे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तेलबियांमधून बाष्प काढायचे तंत्र आहे ज्यामुळे आपल्याला अगदी शुद्ध रूपातील तेल मिळते व त्या तेलाचे शेल्फ लाईफ पण जास्त असते.

हे यंत्र कठीण आणि तेलाचा अंश कमी असलेल्या तेल बियांमधून तेल काढू शकत नाही उदा. सोयाबीन, मका इत्यादी.

आधुनिक होत असताना आपण आपले आरोग्य सांभाळणे देखील महत्वाचे आहे. आपण जर हा ऑइल एक्सट्रॅक्टर आणला तर शुद्ध तेल वापरल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. तेल काढल्या नंतर जी पेंड मिळते तिचाही आपण उत्तम प्रकारे वापर करू शकतो.

इथे क्लिक करून आपण आजच हे यंत्र मागवू शकता.