स्मार्ट कॉफी मेकर | Nescafe e Smart Coffee Maker

Smart Coffee Maker
Smart Coffee Maker

कॉफी ! नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला गरम गरम वाफाळणाऱ्या कॉफीचा सुगंध मनात दरवळायला लागतो, आणि लगेचच कॉफी प्यायची इच्छा होते. परंतु रोजच्या कामाच्या धावपळीत किंवा ऑफिसचे काम करत असताना कुठे आपल्याला कॉफी करायला वेळ मिळतो, पण समजा हीच कॉफी ऑटोमॅटिक झाली तर ? मस्तच ना ! तर अशाच एका स्मार्ट आणि ऑटोमॅटिक कॉफी मेकर बद्दल जाणून घेऊ.

हा कॉफी मेकर स्मार्ट आहे म्हणजेच आपण आपल्या स्मार्टफोन वरून त्याला सूचना देऊन लगेचच कॉफी बनवू शकतो. नेसकॅफेने  पहिल्यांदाच अशाप्रकारचा कॉफी मेकर बाजारात आणला आहे. ह्याला ब्लू टूथ आहे. नेसकॅफेने एक ॲप बनविले आहे. कॉफी मेकर चा ब्लू टूथ आणि आपल्या स्मार्ट फोनचा ब्लू टूथ पेअर(जोडायचा)  करायचा, ते ॲप सुरु करायचं आणि आपल्याला हवा तो कॉफी चा प्रकार सिलेक्ट करायचा की एक ते दीड मिनिटात आपली कॉफी तयार.फक्त एक बटन क्लिक करा आणि  विविध प्रकारच्या आकर्षक गरम आणि थंड कॉफीच्या प्रकारांचा आनंद घ्या.

आकाराने एका मग एवढा असल्याने तो आपण आपल्या सोबत कुठेही नेऊ शकतो. शिवाय झाकण घट्ट असल्यामुळे यामध्ये गळणे किंवा सांडणे असले प्रकार अजिबात होत नाहीत.यामध्ये फेस येण्याचे एक विशिष्ट फिचर आहे त्यामुळे अतिशय उत्तम चवीची कॉफी बनते. आपण हॉट किंवा कोल्ड दोन्ही प्रकारची कॉफी बनवू शकतो. यामध्ये थर्मल इन्सुलेशन असल्यामुळे तुमचे पेय उबदार किंवा थंड राहते. यातला मग २१० मि.ली. चा आहे.

हा दिसायला आकर्षक आणि ट्रेंडी तर आहेच शिवाय वायरलेस कनेक्टिव्हीटी देखील आहे. हा आपण डिश वॉशर मध्ये स्वच्छ करू शकतो.

स्मार्ट कॉफी मेकर ब्लू टूथला जोडण्याची पद्धत

  • तुमचा मग प्लग इन डॉकिंग स्टेशनवर ठेवा आणि LED लाइट बंद असल्याची खात्री करा.
  • तुमच्या स्मार्ट फोनची ब्लूटुथ आणि लोकेशन सर्व्हिस चालू करा.
  • NESCAFÉ É कनेक्टेड मग ॲप इंस्टॉल करा आणि उघडा.
  • ॲपवरील पेअरिंग  सूचनांचे अनुसरण करा.
  • ॲपद्वारे सूचित केल्यावर 3 सेकंदांपेक्षा जास्त काळ LED बटण दाबून ठेवा.
  • पेअरिंग एररच्या(Pairng Error) बाबतीत LED बटण 10 सेकंदांपर्यंत दाबा आणि धरून ठेवा जोपर्यंत ते वेगाने निळ्या रंगाचे होत नाही. हे ब्लुटूथ  पुन्हा सक्रिय किंवा निष्क्रिय करेल. त्यानंतर आप रिस्टार्ट करा आणि पेअरिंग ची प्रक्रिया पुन्हा सुरु करा.

स्मार्ट कॉफी मेकर वापरण्याची पद्धत

  • आप वर आवडणारी कॉफी सिलेक्ट करा.
  • ई-मग मध्ये नेसकॉफी  घाला, दूध घाला.
  • हाताने सुरु करा किंवा ॲप वरून सुरू करा

इथे क्लिक करून तुम्ही हा स्मार्ट कॉफी मेकर लगेच खरेदी करू शकता.