साधारण ९० च्या दशकात भारतामध्ये फूड प्रोसेसर ही संकल्पना आली आणि त्याचे खूप सारे उपयोग पाहता हळू हळू मूळ धरू लागली इतकी की आता आपण फूड प्रोसेसरविना मॉडर्न किचनची कल्पनाच करू शकत नाही. फूड प्रोसेसर या नावावरूनच लक्षात येत की त्यात फूडवर म्हणजेच अन्नावर काही प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया केली जाते. स्वयंपाक घरात अशा बऱ्याच क्रिया असतात ज्या वारंवार कराव्या लागतात जसे की बारीक तुकडे करणे, काप करणे, चिरणे, किसणे इत्यादी, सोप्या वाटत असल्या तरी फारच वेळखाऊ असतात. सध्याच्या वेगवान काळात आपल्याला सर्व गोष्टी जलद गतीने करायच्या असतात त्यामुळे फूड प्रोसेसर हा अतिशय उत्तम पर्याय ठरतो.
फूड प्रोसेसर हे एक अष्टपैलू विद्युत उपकरण आहे जे तुम्हाला विविध प्रकारे सर्व प्रकारचे पदार्थ कमी वेळेत तयार करण्यास मदत करते . चिरण्यापासून ते पीठ मळण्यापर्यंत, फूड प्रोसेसर अनेक कामे त्वरीत करू शकतो जी आपल्याला हाताने पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. फूड प्रोसेसरचा आकार रुंद आणि प्रशस्त असतो, त्यामुळे जरी मोठया प्रमाणात जेवण बनवायचे असले तरी काम खूप लवकर आणि सहज होते. फूड प्रोसेसर सोबत बऱ्याच ॲटॅचमेण्टस मिळतात ज्यांचा उपयोग आपल्याला किसणे, विविध आकाराचे छोटे काप – मोठे काप करणे, पदार्थ एकदम बारीक करणे, तुकडे करणे इत्यादीसाठी होतो. काही प्रोसेसर्स बाउल इन्सर्टसह देखील येतात जे आपल्याला एकाच वेळी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विविध प्रोसेसिंग करण्यास मदत करतात.
अजून एक सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे पीठ मळणे. आपल्या भारतीय स्वयंपाकात चपाती, पोळी, रोटी, पराठा इत्यादी पदार्थ आवर्जून असतातच आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पीठ मळावे लागते. पीठ मळणे ही क्रिया तशी फार वेळखाऊ असते आणि फारशी कोणाला आवडणारी नसते अशा वेळेस फूड प्रोसेसर आपल्या मदतीला धावून येतो. आपण फूड प्रोसेसर मध्ये अवघ्या एक ते दोन मिनिटामध्ये कोणत्याही पद्धतीने पीठ मळू शकतो उदा. मऊ, घट्ट, सैल इत्यादी. आपण त्यात चपाती, पोळी इत्यादींसोबतच भाकरी, चकली, करंज्या, शंकरपाळीचे सुध्दा पीठ मळू शकतो. फूड प्रोसेसर गोल गोल फिरत असल्याने पीठ हवे तसे व्यवस्थित मळले जाते.
ह्या फूड प्रोसेसरला १२ फंक्शस आहेत. ३ मिक्सरची भांडी आणि एक फूड प्रोसेसिंगचे भांडे आहे म्हणजे मिक्सर आणि फूड प्रोसेसर आपल्याला एकाच मशीन मध्ये मिळतो. शिवाय यामध्ये लिंबू वर्गीय फळे जसे की संत्री, मोसंबी इत्यादीसाठी स्पेशल ज्युसरची ॲटॅचमेण्ट तसेच इतर फळांसाठी सेंट्रल ज्युसरची ॲटॅचमेण्ट आहे. दोन प्रकारचे स्पीड सेटिंग्स तसेच पल्स पण आहे. सुरक्षिततेसाठी सेफ्टी लॉक आहे. याचे विविध ब्लेड्स आणि प्रोसेसिंगच्या चकत्या ठेवण्यासाठी याच्या आतमध्येच एक ड्रॉवर आहे, म्हणजे ब्लेड्स आणि चकत्या हरवण्याचा प्रश्नच नाही.
हा फूड प्रोसेसर संपूर्ण भारतीय बनावटीचा असून याची फ्री होम सर्व्हिस आहे.
इथे क्लिक करून हा फूड प्रोसेसर तुम्ही आत्ता खरेदी करू शकता.
Food Processor Attachments Main food Processor bowl Food Processor Blender Jar Mixer Grinder Big Jar Mixer Grinder small Chataney jar Food Processor Disc Citrus Fruit Juice Attachment Centrifugal juicer attachment Inbuilt Storage for discs