Tag: nozals

केक सजावटीचे साहित्यकेक सजावटीचे साहित्य

केक ! अगदी छोट्यांपासून ते वयस्क आजी आजोबांपर्यंत सर्वाना आवडणारा हा पदार्थ. पाश्चिमात्य देशातून येऊन आधी आपल्या बेकऱ्यांमध्ये डौलाने विराजमान झाला आणि नंतर तो आपल्या घरातल्या स्वयंपाकघरात बनविण्यात आपल्या गृहिणी कधी पारंगत झाल्या हे समजलेच नाही. पूर्वीच्याकाळी जेव्हा गृहिणी केक बनवायच्या तेव्हा तो शक्यतो जास्त सजावट केलेला नसायचा पण  बदलत्या काळाप्रमाणे गृहिणी सुध्दा स्मार्ट झाल्या आणि बेकरीत मिळतो तसा किंबहुना काकणभर जास्तच सुंदर  सजवलेला केक बनवू लागल्या. परंतु केकची सजावट  करणे हे तसे फारच कौशल्यपूर्ण काम आहे किंवा ती एक कलाच आहे.. गृहिणी त्यात पारंगत असतात परंतु त्या कौशल्याला जर का काही साधनांची जोड मिळाली तर त्या अजून आत्मविश्वासाने सजावट करू शकतील.

तर अशाच एका कॉम्बो पॅकची माहिती मी इथे देत आहे, जो अतिशय लोकप्रिय आहे आणि त्यातील वास्तुपण खूप उपयोगी आहेत.

केकसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तो तयार झाल्यावर ठेवण्यासाठी एक छोटं टेबल कारण आपण तो ताटात किंवा एखाद्या डिश मध्ये काढतो पण नंतर मग त्यावर सजावट करणे अवघड होते. तर या कॉम्बो पॅक मध्ये एक छान टर्न टेबल आहे ज्यावर केक ठेवून आपण आरामात केक गोल गोल फिरवून सजावट करू शकतो.   या सोबत एक स्टीलचा स्पॅच्युला (सपाट चमचा) येतो जो केकवर आईसिंग व्यवस्थित पसरविण्यासाठी फार उपयोगी असतो. त्यामुळे केकवर सगळीकडे एकसारख्या प्रमाणात आईसिंग पसरते. शिवाय यासोबत केकवर विविध नक्षीकाम करण्यासाठी १२ आईसिंग नोझलचा एक सेट सुध्दा मिळतो ज्यामुळे आपला केक अजूनच सुंदर बनेल. या सर्व वस्तूंसोबत ३ आइसिंग स्क्रॅपर सुद्धा मिळतात.

या सर्व वस्तू फूड ग्रेड मटेरिअलने बनविलेल्या असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एकदम सुरक्षित आहेत.

चला तर मग मुलांना आणि घरातील इतरांना आवडतील असे सुंदर सुंदर केक्स घरीच बनवूया आणि आपल्यातील कलेला वाव देऊया.

तुम्ही इथे क्लिक करून आत्ता हा कॉम्बो पॅक ऑर्डर करू शकता.