चहाची गाळणी | Basket Shaped Stainless Steel Strainer

चहा !!! अहाहा!!! नुसता चहा म्हणालं तरी डोळ्यासमोर चहाचा वाफाळता काप येतो आणि जे पक्के चहाबाज आहेत त्यांना चहा पिण्याची तलफ येते.

चहा हा जेवढा छोटा शब्द आहे तेवढेच त्याचे बनवायचे प्रकार खूप आहेत. खरतर जेवणातल्या कोणत्याही पदार्थाचे इतके प्रकार नाहीच आहेत, फक्त चहाचेच आहेत.  हा चहा भारतात आला इंग्रजांमुळे आणि इथल्या माणसाने त्याला आपलाच मानला. चहा पिणे आणि चहा प्यायला देणे हे एक वेडच आहे. जे आपल्याला प्रत्येक दुसऱ्या घरात पाहायला मिळतं. पण हल्ली लोकं हेल्थ कॉन्शिअस झालेली आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलं आहे कि पारंपरिक पध्द्तीने बनविलेला चहा सारखा पिला तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळेच चहा पिण्याचे विविध प्रकार अस्तित्वात आले आहेत. जसं की ग्रीन टी , ब्लॅक टी वगैरे.  चहा हा वनस्पतींपासून मिळतो, चहाच्या झाडाची पाने वाळवून चहा बनवला जातो. त्यामध्ये सुध्दा गोळी चहा, पावडर चहा इत्यादी प्रकार असतात. जो तो आपल्या आवडी प्रमाणे चहाची निवड करत असतो. हल्ली तर विविध फुलांचे चहा सुध्दा बनवतात, उदा. गोकर्णाच्या फुलांचा चहा त्याला ब्लु टी म्हणतात कारण तो निळ्या रंगाचा होतो. त्याचे तसे औषधी गुणधर्म पण खुप आहेत. जास्वंदीच्या फुलांचा चहा जो लाल रंगाचा होतो. पण इतके सगळे चहा असले तरी शेवटी प्यायच्या आधी ते गाळावेच लागतात आणि त्याआधी अगदी पूर्वीपासून बाजार विविध प्रकारच्या गाळण्या उपलब्ध आहेत. तर अशाच पद्धतीची एक नवीन गाळणी आली आहे जी आकाराने चेंडू सारखी आहे आणि वापरायला एकदम सोप्पी आहे.

हि वापरण्यासाठी आधी त्यामध्ये चहाची पाने किंवा पूड घालायची, मग त्याचे झाकण लावायचे आणि त्याला असलेल्या साखळीला धरून ती अलगद कप मध्ये ठेवायची आणि मग कप मध्ये गरम पाणी घालायचे, जाळी असल्यामुळे चहापूड किंवा पाने बाहेर येत नाहीत त्यांचा फक्त रंग आणि स्वाद त्या गरम पाण्यात उतरतो आणि एकदम अमृततुल्य चहा तयार होतो. आपल्याला हवे असल्यास आपल्या आवडी व गरजेनुसार आपण त्या चचत साखर व दूध घालू शकतो. आपल्याकडे जर इलेक्ट्रिक किटली असेल तर चहा ही गाळणी वापरून चहा बनवायला २ मिनिटे सुध्दा लागणार नाहीत. कारण किटलीमध्ये एक मिनिटापेक्षा देखील कमी वेळात एक कप पाणी उकळले जाते.

तर अशी ही सुंदर गाळणी आपल्या संग्रही असायलाच हवी. इथे क्लीक करून आपण आत्ताच ही सुंदर गाळणी मागवू शकता.

Tea Strainer
Tea Strainer