आपल्याला हल्ली भरपूर भाजी, फळे आणि इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी घरात आणून ठेवाव्या लागतात, परंतु जर लवकर वापरल्या गेल्या नाहीत तर अशा गोष्टी खराब होण्याची शक्यता असते. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण त्यासाठी व्हॅक्युम सीलिंग मशीन आले आहे. खरंतर पदार्थ हवेच्या संपर्कात आले की ते खराब होतात, त्यासाठी आपण ते ज्या कंटेनरमध्ये ठेवतो तिथे हवेचा संपर्क झाला नाही तर तो पदार्थ बरेच दिवस टिकू शकतो, व्हॅक्यूम सीलिंग मशीन अगदी हेच काम करते. फळे किंवा भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवण्याआधी एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवतो आणि ते जर खूप दिवस तसेच ठेवले गेले तर फ्रिजमध्येसुद्धा खराब होतात पण जर का आपण त्यातली संपूर्ण हवा काढून टाकली तर ते दीर्घकाळ टिकू शकतात.
कोणत्याही पदार्थाची मूळ स्थिती दीर्घकाळासाठी आहे अशीच ठेवण्यासाठी आपल्याला तो व्हॅक्युम मध्ये ठेवावा लागतो म्हणजेच हवेचा संपर्क अजिबात टाळवा लागतो. त्यासाठी हे व्हॅक्युम सिलिंग मशीन फारच उपयोगी आहे. हे मशीन वापरण्यासाठी आपल्याला खास त्यासाठी बनविलेल्या प्लास्टिक बॅग्सचा वापर करावा लागतो.
वापरायला हे मशीन अतिशय सोपे आहे, बस एक बटण दाबले कि काम होते. यावरच्या एल इ डी इंडिकेटर लाईटमुळे ते चालू आहे कि बंद हे आपल्याला समजते. जो पदार्थ आपल्याला व्हॅक्युम सील करायचा आहे त्याला खास त्यासाठी बनविलेल्या प्लास्टिक पिशवी मध्ये घालायचा असतो मग ते मशीन सुरु करून त्या पिशवीचे तोंड काळ्या रंगाच्या सिलिंग रिंग मध्ये ठेवायचे आणि ते वरून बंद करायचे आणि नंतर हिरव्या रंगाचा स्विच चालू करायचा. हे मशीन त्या पिशवी मधली सगळी हवा काढून टाकते आणि पदार्थ व्हॅक्युम सील होतो.
हे मशीन वापरून आपण कोणत्याही भाज्या, फळे, मटण, मासे , शिजवलेले अन्न, सुकामेवा असे बरेच पदार्थ दीर्घकाळ टिकावू शकतो. याचा वापर केल्याने स्वयंपाकघरात होणारी अन्नाची नासाडी आपण टाळू शकतो.
असे हे अत्यंत उपयुक्त मशीन घ्या आणि अन्नाची नासाडी टाळा.
इथे क्लिक करून तुम्ही हे व्हॅक्युम सिलिंग मशीन आत्ताच मागवू शकता.