साल काढणी

Veg Peeler

सध्याचा काळ हा प्रेसेंटेशनचा आहे मग ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्रोजेक्टचे असो किंवा लग्न समारंभाचे असो वा खाद्य पदार्थांचे असो  ते उत्तमच झाले पाहिजे. हॉटेल्स मध्ये, पार्टीजना हल्ली पदार्थ छान सजवून देतात.  आताच्या कुकरी शोज, यु ट्यूब रेसिपी चॅनेल्समुळे आपण देखील पदार्थ सजवू लागलोय आणि त्यासाठी आपल्याला नवीन साधनांची गरज पडते जसे की ही साल काढणी. पारंपरिक साल काढणी जवळपास सर्वांच्याच घरी असते. तिचा उपयोग आपण बटाट्याची साले काढणे, दोडक्याच्या शिरा काढणे, गाजर सोलणे इत्यादीसाठी होतो.आता साल काढणी मध्ये देखील खूप नवीन तंत्रज्ञान आले आहे ज्यामुळे फळे व भाज्यांची साले काढणे अजून सोपे झाले आहे.नवीन पद्धतीच्या साल काढणीचा उपयोग आपण भाज्यांची साले काढण्या बरोबरच अजून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो जसे की,

सफरचंद किंवा काकडीचे पातळ काप करून त्यांची गुलाबासारखी फुले बनविणे जी पदार्थ सजविण्यासाठी खूप आकर्षक वाटतात.

गाजर, झुकिनी, काकडी , बीट इत्यादींचे सलाड मध्ये घालण्यासाठी एकसारखे उभे काप (किसल्यासारखे ) करणे.

केकवर घालण्यासाठीचे चॉकलेट कर्ल बनविणे.

सजावटी साठी चीजचे व बटरचे देखील आपण पातळ काप करू शकतो.

ही स्टेनलेस स्टीलची साल काढणी एकदम गुळगुळीत, धरायला सोपी आणि आरामदायी आहे. हिचा वापर करून जास्त जोर न लावता आपण सहजपणे साले काढू शकतो.

हे उत्पादन उच्च दर्जाच्या सामग्रीने  बनविले आहे. ह्या साल काढणीवर गंज चढत नाही, डाग पडत नाहीत, शिवाय स्टेनलेस स्टीलची असल्यामुळे स्वच्छ करायला देखील सोपी आहे. ही अतिशय मजबूत आणि टिकाऊ आहे.

अशी ही छोटीशी नवीन पध्द्तीची साल काढणी आपल्या घरी असायलाच हवी ज्यामुळे आपल्याला झटपट पदार्थ सजविता येतो. मग ऐनवेळेला आलेले पाहुणे असू देत नाहीतर आपल्या रुसलेल्या लहानग्याचा रुसवा काढायचा असू दे बस काही क्षणात आपण पदार्थ अगदी उत्तम प्रकारे सजवू शकतो.

इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच  ही साल काढणी  खरेदी करू शकता