आक्रोड फोडायचे यंत्र | Walnut Opener

आक्रोड म्हंटल की  आपल्या डोळ्यासमोर एक टणक कवचाचे फळ येते ज्याच्या आत मध्ये एक तपकिरी रंगांचे फळ असते. अक्रोडाच्या त्वचेला कधीकधी किंचित कडू चव असते, परंतु ते  स्वतः सौम्य असते. आक्रोड हे एक सुक्यामेव्यातील फळ आहे.  हल्ली डॉक्टर बऱ्याचदा आक्रोड खायचा सल्ला देतात कारण कॅन्सर, मधुमेह इत्यादींसारख्या आजारांमध्ये त्याचा बराच फायदा होतो. अक्रोडमध्ये हृदयासाठी उपयुक्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. तर अशा ह्या आक्रोडचे कितीही फायदे असले तरी त्याचे कठीण कवच फोडण्याच्या त्रासामुळे आपण शक्यतो त्याच्या वाटेलाच जात नाही, पण आता त्याची  काळजी नको, कारण आता आले आहे कठीण आक्रोडचे कवच फोडण्याचे यंत्र. हे फक्त आक्रोडचेच कवच फोडते असे नाही तर बदामाचे वगैरेदेखील कवच फोडायला उपयोगी आहे. या यंत्राचे डिझाईन अशाप्रकारे बनविलेले आहे कि लहान, मोठे  वृध्द्व कोणालाही हे सहजपणे वापरता येईल.

हे फळ या यंत्राच्या नरसाळ्यासारख्या भागात व्यवस्थित बसते आणि फोडायला सोपे होते. यामुळे फळाचे तुटलेले कवच देखील इतस्ततः पसरत नाही. हे यंत्र बॉटल ओपनर म्हणून देखील कार्य करू शकते.पारंपारिक क्रॅकरने स्वतःला इजा न करता या यंत्राने आक्रोड, बदाम यासारखी कठीण कवचाची छोटी फळे फोडा किंवा बॉटल ओपनर म्हणून वापरा.

हा टिकाऊ नट क्रॅकर हेवी ड्युटी अॅल्युमिनियम मिश्र धातुपासून बनलेला आहे ज्यामध्ये उच्च-शक्तीचे कॉम्प्रेशन हँडल्स आहेत आणि ते वाकणार नाहीत किंवा गंजणार नाहीत.

याचे हॅन्डल्स सॉफ्ट रबर ग्रीपचे बनलेले असल्यामुळे आपले हात थंड पडत नाहीत आणि ते हातात पकडायला छान वाटते. याच्या अर्गोनॉमिक्स डिझाईनमुळे हे वापरायला अतिशय सुलभ आहे. फक्त थोडासा दाब दिला कि कवच क्षणात फुटते. हे फक्त कवच फोडते परंतु आतील फळ सुरक्षित राहते.

एवढे उपयोगी हे यंत्र इथे क्लिक करून तुम्ही आत्ताच मागवू शकता.