सध्याच्या काळात घरात एखादा छोटासा वजनकाटा असणे ही आवश्यक बाब झाली आहे कारण हल्लीच्या मॉडर्न गृहिणी बरेच वेगवेगळे- हॉटेलसारखे किंवा परदेशी -पदार्थ घरीच बनवू लागल्या आहेत, त्यासाठी त्यामध्ये घालायचे जिन्नस हे अगदी मोजून मापून घेतलेले असणे गरजेचे असते. पूर्वीच्या वाटी आणि चमच्याच्या मापापेक्षा अगदी अचूक मापाने जिन्नस मोजून घेतले तर पदार्थ बिघडण्याची शक्यता बरीच कमी असते.
हल्ली बरेचजण डाएट करतात तर अशावेळी अन्नपदार्थ मोजून घ्यावे लागतात तेव्हादेखील या वजनकट्याचा खूप उपयोग होतो किंवा घरी कोणी पेशंट असेल तर तेंव्हासुध्दा याचा बराच उपयोग होतो.
घरगुती वापरासाठी मोठा – भाजीवाल्यांकडे असतो तसा – वजनकाटा घेऊन उपयोग नसतो कारण तो फार मोठा असतो व अचूक वजन करण्यासाठी बरीच खटपट करावी लागते. परंतु या इलेकट्रोनिक वजनकट्याने आपले सगळे त्रासच कमी केले आहेत.
या वजनकट्याचा जो डिस्प्ले आहे तो छान मोठा आहे त्यामुळे वजन वाचताना डोळे अगदी बारीक करावे लागत नाहीत व वाचायला सोपे होते. डेटा स्थिर असताना वाचन स्वयंचलितपणे लॉक होते.
अतिशय अचूक असणारा हा वजनकाटा अत्यंत कमी वीज वापरतो. तसेच बॅटरी कमी झाली आहे हे दाखवणारा इंडिकेटरदेखील त्यावर आहे.
हा घरगुती वापरासाठीचा आणि छोटा असल्याने ह्याची कमाल क्षमता १० किलोची आहे. त्याचे स्वतःचे वजन ४०० ग्रॅमच्या आसपास आहे त्यामुळे सहज हातातून नेता येण्याजोगा आहे.
वस्तूच्या वरील वेष्टणाच्या वजनानुसार वस्तूच्या एकूण वजनात वजावट करण्याचे एक फंक्शनदेखील आहे.
स्वयंचयामध्ये ऑटोमॅटिक शून्य करणे व ३ सेकंदांनी ऑटोमॅटिक बंद होणे हे फंक्शन्ससुध्दा आहेत.
इथे क्लिक करून तुम्ही आत्ता लगेचच हा वजनकाटा खरेदी करू शकता.